Local Body Polls Result 2025: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी काल मतदान झाले. आज राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी 21 डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे.. 

सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी शक्यता आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढले.

  • 2025-12-21 18:12:45

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले की, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे "यश" हे भाजप संघटना आणि सरकारच्या सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. Devendra Fadnavis: नगरपंचायत निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले… ‘हा विजय’
  • 2025-12-21 17:48:37

    खेडमध्ये महायुतीने दिला 21-0 असा क्लीन स्वीप

    2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना नामोहरम केले .  ‘या’ नगरपरिषदेत महाविकास आघाडीचा सुफडासाफ! महायुतीचे सर्व 21 उमेदवार दणदणीत विजयी
  • 2025-12-21 17:04:49

    पैठणमध्ये दगडफेक

    छत्रपती संभाजीनगर : पैठण मध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाला. वादा नंतर दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही पराभूत एकमेकांना पराभूत करण्यात जबाबदार असल्याचा वाद विकोपाला गेला.  दोन्ही पराभूत उमेदवार आणि त्यांचे गट एकमेकांसमोर भिडले. पैठणच्या नेहरू चौक मध्ये निवडणुकीच्या वादावरून दगडफेक झाली. 

  • 2025-12-21 15:32:50

    Pune Local Body Election Results: पुण्यात कोणी मारली बाजी?

    पुणे ग्रामीणमध्ये कोणी बाजी मारली याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. राज्यातील विविध नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून दौंड, जेजुरी, सासवड आणि इंदापूर या नगरपरिषदांमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.

    सविस्तर वाचा -
    Pune Local Body Election Result: पुणे ग्रामीणमध्ये कोणी मारली बाजी? नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर; वाचा सविस्तर
  • 2025-12-21 15:20:43

    साताऱ्यात तब्बल 42 हजार मतांनी निवडून आला भाजपचा नगराध्यक्ष

    साताऱ्यात तब्बल 42 हजार मतांनी निवडून आला भाजपचा नगराध्यक्ष विजयी - अमोल मोहिते, भाजप मिळालेली मते - 57 हजार 596 पराभूत उमेदवार- सुवर्णादेवी पाटील, राष्ट्रवादी (शप) मिळालेली मते - 15 हजार 556
  • 2025-12-21 15:13:10

    भाजप सर्वाधिक ठिकाणी विजय, सविस्तर लिस्ट

    राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा घेतल्या आहेत. आज 21 डिसेंबर रोजी सर्व मतदानाची मतमोजणी झाली. आता निकाल समोर आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवला आहे.    Maharashtra Election Result: राज्यात भाजपाचा सर्वाधिक विजय; पाहा पक्षनिहाय कुठे कोणाचा नगराध्यक्ष? सविस्तर लिस्ट
  • 2025-12-21 14:19:46

    भाजपने अभूतपूर्व आणि मोठा विजय मिळवला

    "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होते की, त्यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अभूतपूर्व आणि मोठा विजय मिळवला आहे..." महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल 2025 बद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • 2025-12-21 14:14:33

    खामगावमध्ये भाजपने 18 जागांवर मिळवला विजय

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये भाजपने 18 जागांवर विजय मिळवला असून, पक्षाचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.
  • 2025-12-21 13:33:25

    Maharashtra Nagar Parishad Election Results 2025: पालघरमध्ये नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता

    पालघर मध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार उत्तम घरत यांनी नगरपरिषद निवडणूक जिंकली. 30 जागांपैकी शिंदे गटाने 19, भाजपने 8 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 3 जागांवर विजय मिळवला.  
  • 2025-12-21 13:29:57

    Maharashtra Nagar Parishad Election Results 2025: तुकाराम म्हात्रे विजयी

    बदलापूरमध्ये शिवसेना (शिंदे गट) चे तुकाराम म्हात्रे यांनी दलापूर प्रभाग क्रमांक 1 मधून स्पष्ट विजय मिळवला असून, निकाल जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.  
  • 2025-12-21 12:51:20

    Maharashtra Municipal Council Panchayat Result 2025: कोल्हापुरात मतमोजणी सुरळीत सुरु

    कोल्हापूर जिल्हा - नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025, सर्व 13 नगरपालिका ठिकाणी मतमोजणी सुरळीत सुरु असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • 2025-12-21 12:42:42

    सर्वत्र महायुतीचेच वर्चस्व राहील - गिरीश महाजन

    "नगरपरिषदा आणि नगरपालिकांचे सर्व निकाल जाहीर होतील. मी खात्रीने सांगू शकतो की, महायुतीचेच पूर्ण वर्चस्व राहील. उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास, इतरांसाठी परिस्थिती खूपच कठीण असेल... जवळपास सर्वत्र महायुतीचेच वर्चस्व राहील.. असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांवर मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
  • 2025-12-21 12:19:48

    Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025: खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय

    खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला. शिवसेना नेत्या माधवी राजेश बुटाला यांची नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या विजयाचा जल्लोष केला.
  • 2025-12-21 11:54:13

    पैसा वाटण्यात आला - वडेट्टीवारांचा आरोप

    "मी आधीच म्हटले होते की भाजपजवळ सर्व काही आहे, पैसा, सत्ता, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सर्व काही त्यांच्याकडे आहे. इतका पैसा वाटण्यात आला आहे. या सगळ्याचा वापर करून तो पहिल्या क्रमांकावर येत आहे, आणि आम्ही जे काही मिळवत आहोत ते जनतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे..." असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलताना काँग्रेस नेते विजय नामदेवराव वडेट्टीवार म्हणाले. https://twitter.com/ians_india/status/2002615413394513969
  • 2025-12-21 11:34:44

    Local Body Polls Result 2025: भगूरमध्ये 25 वर्षांची सत्ता अजित पवारांनी उलथवली

    भगूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी उलथापालथ झाल्याची पाहायला मिळाली. अजित पवार गटाने शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे.
  • 2025-12-21 10:31:56

    Local Body Election Results 2025: धुळे जिल्ह्यात मतमोजणी सुरू, चोख बंदोबस्त

    धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. नव्याने स्थापन झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेसह शिरपूर आणि शिंदखेडा नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. https://twitter.com/ians_india/status/2002604261868515481
  • 2025-12-21 10:20:36

    Maharashtra Local Body Elections 2025: वर्धा जिल्ह्यात 62.78 टक्के मतदान

    वर्धा जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी 62.78 टक्के... वर्धा नगरपरिषद : 56.05 % हिंगणघाट नगरपरिषद : 59.87 % पुलगाव नगरपरिषद : 57.66 % देवळी नगरपरिषद : 70.46 %
  • 2025-12-21 10:16:40

    Maharashtra Local Body Elections Results 2025: लातूरात 545 उमेदवारांचे राजकीय भवितव्य होणार निश्चित

    लातूरमधील एका नगरपंचायत आणि चार नगरपरिषदांचे निवडणूक निकाल आज जाहीर होणार असून, यामुळे 32 अध्यक्ष आणि 128 नगरसेवक पदांसाठी निवडणूक लढवणाऱ्या 545 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होईल. https://twitter.com/ians_india/status/2002598427314827663
  • 2025-12-21 10:12:32

    Maharashtra Municipal Council Panchayat Result 2025: निवडणुकीची मतमोजणी सुरू

    छत्रपती संभाजीनगर: नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार असल्याने, कडक पोलिस तपासणीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रक्रिया पाहण्यासाठी केंद्रात प्रवेश देण्यात आला आहे. https://twitter.com/IANSKhabar/status/2002598680894083543
  • 2025-12-21 09:49:44

    Maharashtra Nagar Parishad Election Results 2025: 9 जागांवर शिवसेनेचा नगराध्यक्ष - तुमाने

    “नागपूरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील. किमान 9 जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून येणार आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने नागपूर विभागात केलेले संघटनात्मक काम, स्थानिक प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि विकासाचा मुद्दा याचा फायदा पक्षाला होणार आहे. तसंच, सुमारे दीडशेहून अधिक जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे.
  • 2025-12-21 09:05:20

    Nagar Parishad Result Live: अनगर, दोंडाईचा आणि भुसावळ येथील सर्व जागा बिनविरोध

    राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, मतमोजणीच्या आधीच अनगर, दोंडाईचा आणि भुसावळ नगरपंचायत सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. Nagar Parishad Result: मतमोजणीच्या आधीच 3 जागांचा लागला निकाल! भाजपाचे उमेदवार विजयी
  • 2025-12-21 08:53:55

    Nagar Panchayat Result 2025: थोड्याच वेळात निकाल

    राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो? हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे.
  • 2025-12-21 08:47:01

    Municipal Council Result 2025: आज 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी

    जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
  • 2025-12-21 08:46:04

    Municipal Council Result 2025 - आज निकाल

    राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी काल मतदान झाले. आज राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी 21 डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होईल.