जेएनएन, मुंबई. Lalbaugcha Raja 2025: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजा चा पहिला लूक नुकतेच मंडळाकडून दाखवण्यात आली आहे. गणेशोत्सव सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी लालबागच्या राज्याची पहिली झलक दाखवण्यात (Lalbaugcha Raja 2025 First Look) आली आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा (Lalbaugcha Raja 2025) करीत आहे. त्याचपार्श्वभूमीवर मंडळाकडून लालबागचा राजा 2025 ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. यंदा लालबागच्या राजाचा राजेशाही थाट पाहून भाविक हे भारावून गेले आहेत.

Lalbaugcha Raja 2025

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रा यंदाही घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली होणार आहे. मुंबईतील मंडळांचे गणपती विशेषतः प्रसिद्ध असून, जगभरात त्यांची ख्याती आहे. यापैकीच एक म्हणजे 'नवासाला पावणारा गणपती' अशी ओळख लालबागच्या राजाची आहे.

हेही वाचा - Lalbaugcha Raja 2015-2025: लालबागच्या राजाचे मागील दहा वर्षातील अवतार, पाहा Photos…

Lalbaugcha Raja 2025

लालबागचा राजा 2025 थीम

लालबागच्या राजा मंडळाने आपल्या गणपतीची पहिली झलक दाखवली आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे. यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारला आहे.

    Lalbaugcha Raja 2025 - लालबागचा राजा 2025

    यंदा लालबागच्या राजाची मूर्ती वात्सल्याने भरलेली असून, ती सोनेरी अलंकारांनी सजवलेली आहे. सोन्याच्या पादुकांपासून ते सोन्याच्या राजमुकुटापर्यंत राजाचा हा राजेशाही थाट भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची वाढवण्यात आली असून हे दृश्य अधिक भव्य दिसत आहे.