जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana News) जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे. मात्र, जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. त्यामुळे आता Ladki Bahin Yojana August Installment कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा झाली नसेल, तर खालील पद्धतींचा अवलंब करा.
पात्रता तपासा
- पात्रता तपासा - तुमची अर्ज केलेली माहिती योग्य आहे आणि तुम्ही या योजनेच्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करत आहात, याची खात्री करा. माहितीतील काही त्रुटी असल्यास अर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
- बँक खाते पडताळणी - अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे आणि खाते सक्रिय आहे, याची खात्री करा. खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो
हेल्पलाईनवर करा संपर्क
- हेल्पलाईन - योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 वर संपर्क साधा. हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन करतील.
- सूचनांवर लक्ष ठेवा - स्थानिक बातम्या किंवा राज्य सरकारच्या सूचनांवर लक्ष ठेवा, कारण ते योजनेबद्दल अधिक माहिती देऊ शकतात, विशेषत: प्रलंबित रक्कम कधी आणि कशी जमा केली जाईल याबद्दल.
स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा
- स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा - तुमच्या परिसरातील महिला व बालविकास (WCD) कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या - महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला भेट द्या. तिथे देण्यात आलेल्या अद्यतने आणि सूचना तपासा.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी सांगितले स्पष्टच...
लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria)
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे (Reasons for Ladki Bahin Yojana Ineligible)
- लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.
- जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
- अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 26 लाख अपात्र लाभार्थी, 1500 रुपये नाहीत मिळणार?
26 लाखांहून अधिक अपात्र महिलांची ओळख पटली
लाडकी बहीण योजनेचे 26 लाख अपात्र लाभार्थी ओळखले गेले आहेत. ही माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी एका पोस्टद्वारे दिली. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. तथापि, सर्व पात्र महिलांना योजनेचे लाभ मिळत राहतील यावर त्यांनी भर दिला.