जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Scheme: महायुती सरकार राज्यात आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही योजनांना कात्री देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी गोरगरीबांचं जेवण आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी बंद करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

अनेक योजनाला सरकार कात्री लावणार!

Ladki Bahin Yojna मुळे राज्य सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. लाडकी बहिण योजनासाठी प्रत्येक वर्षाला तब्बल 50 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. लाडकी बहिण योजनामुळे अनेक योजनाला राज्य सरकार कात्री लावणार असल्याची माहिती आहे.

या योजना बंद होऊ शकतात ?

आनंदाचा शिधा – दरवर्षी सणासुदीला गोरगरीबाच्या घरी 100 रुपयाला आनंदाचा शिधा दिले जात आहे. त्यामध्ये रवा, तेल, डाळी आदीचा समावेश आहे. 

    आनंदाचा शिधात काय आहे?

    1 किलो रवा, 

    1 किलो चना डाळ,

    1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल

    शिवभोजन थाळी – गरीब आणि कामगार वर्गाला वरदान ठरली आहे. फक्त 10 रुपयाला शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात येत आहे.

    शिवभोजन थाळी काय मिळते?

    2 चपात्या

    1 वाटी भाजी

    1 वाटी भात

    1 वाटी वरण

    आर्थिक शिस्त गरजेची 

    राज्य सरकार आर्थिक शिस्त लावण्याची काही योजना बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार काही योजना बंद करण्याची तयारी करत आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी दर महिनाला 4 हजार कोटी रुपयाचा खर्च होत आहे. तर वर्षाला ५० हजार कोटी रुपयाचा खर्च लाडकी बहीण योजनेवर होत आहे.

    आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाली योजना कायमची बंद होणार?

    राज्य सरकारने आर्थिक बोझा कमी करण्यासाठी मंत्रालयीन विभागात अनेक ठिकाणी कात्री लावली आहे. लाडकी बहीण योजनासाठी आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना कायमची बंद करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली असल्याची माहिती आहे.