जेएनएन, मुंबई. Metro Pillar Collapse: मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. वडाळाच्या दिशेने जाणाऱ्या चेंबुरमधील अर्धवट बांधकाम असलेला मेट्रो पिलर रहिवासी इमारतीवर कोसळला आहे. वीस फुटाचे उघडे असलेल्या लोखंडी सळ्या इमारतीमध्ये कोसळले आहे. 

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास

या दुर्घटनेत राहवासी सोसायटीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चुनाभट्टी परिसरातील सुमन नगर जंक्शन भागात ही घटना घडली.

मोठी घटना घडली 

मुंबई शहरात मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी मेट्रो विकासाची  कामे सुरू आहेत. मुंबईतील लोकलमधील गर्दी आणि सुविधाजनक प्रवाससाठी मेट्रो विकासाची कामे सुरू असतानाच ही मोठी घटना घडली आहे.

हेही वाचा - Budget 2025: अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून, राष्ट्रपतींच्या भाषणाने सुरुवात; विरोधक आक्रमक भूमिकेत

    20 फूट लांब सळया रहिवाशी इमारतीवर कोसळल्या

    चेंबूर ते वडाळाच्या दिशेने मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकसाठी पिलरचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान अचानक मेट्रोचा पिलर एका रहिवासी इमारतीवर कोसळला असल्याने सद्या त्या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे. मेट्रो पिलरचे अर्धवट बाधकाम असलेले जवळपास 20 फूट लांब सळया रहिवाशी इमारतीवर कोसळले आहे. (Mumbai Metro pillar collapse)

    मलबा घटवण्याचे काम सुरु 

    या पिलरमुळे सोसायटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पिलर कोसळल्याची माहिती मिळताच मेट्रो विभाग आणि बांधकाम करणारी कंत्राटीची एक टीम घटनास्थळी पोहचली आहे. सोसायटीमधून लोखंडी सळया काढण्याचे काम सुरू आहे.