जेएनएन, ठाणे. Kalyan Shiv Sena News: कल्याणमध्ये शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिस ठाणे परिसरातच हाणामारी झाल्याचा प्रकार झाला होता. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनं कल्याण मधील कार्यकारणी पदासह बरखास्त केली आहे.
पोलीस ठाण्यातच बाचाबाची
कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. प्रभागातील पाणी प्रश्नावरून शिंदे गटाचे दोन्ही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्या बाचाबाची झाली आणि पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर दोन्ही गटात राडा झाला होता.
सविस्तर वाचा - Maharashtra News: पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, कार्यकर्त्याचे डोकं फोडलं
शिवसेना कार्यकारणी बरखास्त
कल्याणमध्ये झालेल्या दोन्ही राडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने निर्णय घेत शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख पदासह इतर सर्व पदे बरखास्त केली आहेत, अशी माहिती शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी दिली. यानंतर आता नव्याने मुलाखती घेऊन पदे जाहीर केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन
दरम्यान, प्रभागात पाणी प्रश्नावरून वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वादादरम्यान माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा एका कार्यकर्त्यावर शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी यांनी आरोप केला होता.
हेही वाचा - Maharashtra Former News: शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2555 कोटी विमा नुकसान भरपाई
मारहाणीचा आरोप
तर, या राड्यात शिंदे गटाचे उप शहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मल्लेश शेट्टी यांच्यावर त्यांनी मारहाणीचे आरोप केले होता. दिलीप दाखिनकर यांच्या एक व्हिडिओ समोर आला होता त्यात त्यांच्या डोक्याला जखम दिसत होती.