जेएनएन, मुंबई. Innovation City in Navi Mumbai: महाराष्ट्रचा विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईचा विकासला गती देण्यासाठी आणि मुंबईतील वाढती गर्दी व लोकसंख्या लक्षात घेता 300 एकरात एक नवीन 'इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नवी मुंबईत 300 एकरवर Innovation City
नवी मुंबई लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळचे संचालन सुरू होणार आहे. यामुळे नवी मुंबईतील व्यापाऱ्यात व आर्थिक उलाढालदेखील वाढणार आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी नवी मुंबईत 300 एकरचे 'इनोव्हेशन सिटी' उभारत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा - Mahashivratri 2025: जेजुरी गडावर महाशिवरात्रीनिमित्त त्रैलोक्य दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
डेटा सेंटरसाठी 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे करार
नवी मुंबईत एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे आणि राज्य या सुविधेजवळ एक पूर्णपणे नवीन शहर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. राज्य सरकार नवी मुंबईत एक जागतिक क्षमता केंद्र 'पार्क' देखील उभारत आहे. अलीकडेच डेटा सेंटरसाठी 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणारे अनेक सामंजस्य करार झाले आहेत. त्यासाठी नवी मुंबईत एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारले जाणार आहे.
हेही वाचा - रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी असू शकते हानिकारक, जाणून घ्या सकाळच्या चहापूर्वी पाणी पिणे का आवश्यक
नोकऱ्यांचे स्वरुपही बदलणार
नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार असून ती जगभराशी जोडलेली असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पुढील काळात वाढणार असून राज्य सरकारने 'गुगल'सोबत शासकीय पातळीवर तंत्रज्ञान वापरण्याबाबत करार करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्यांचे स्वरुपही बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
हेही वाचा - रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी असू शकते हानिकारक, जाणून घ्या सकाळच्या चहापूर्वी पाणी पिणे का आवश्यक
10000 पेक्षा अधिक महिलांना एआयमध्ये प्रशिक्षण
टेक जायंट मायक्रोसॉफ्टच्या उपक्रमांतर्गत राज्यातील दहा हजार पेक्षा अधिक महिलांना एआयमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.