जेएनएन, मुंबई. 300 Rupee Coin in India: देवी अहिल्याबाईंच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील पहिले 300 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे आणि त्यात 50 टक्के चांदी आहे. एका बाजूला अहिल्याबाईंचा फोटो आहे. देशात आणि जगात जारी होणारे हे पहिलेच नाणे आहे, ज्याची किंमत 300 रुपये आहे.

300 रुपयांच्या नाण्याची विशेषत:

अर्थमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे नाणे 35 ग्रॅम वजनाचे आहे. त्यामध्ये 50 टक्के चांदी आहे. नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र असेल. चित्राच्या वरच्या परिघात हिंदीमध्ये "अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती" आणि खालच्या परिघात इंग्रजीमध्ये तेच कोरलेले असेल. त्यांच्या चित्राच्या दोन्ही बाजूंना 1725 आणि 2025 हे आकडे अंकित आहेत.

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोकस्तंभ आणि त्याच्या खाली ₹300  असे मूल्य नमूद केलेलं आहे. अशोकस्तंभाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीमध्ये 'भारत' असे लिहिलेले आहे. हे देशातील पहिले ₹300 चे नाणे असेल आणि ते केवळ स्मारक म्हणून असेल, चलनात येणार नाही, असं अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलेलं आहे.