जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली उत्तिर्ण झाल्या आहेत. तर यंदा 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

14 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला होता. 

मुलींनी मारली बाजी

दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली, तर 86.80 टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या तुलनेत 6.35 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.  

लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल

    राज्याच्या नऊ विभागांपैकी लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 84.14 टक्के इतका हा निकाल आहे. मागच्या वर्षीही लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल होता.

    कोकण विभाग अव्वल

    बारावीच्या (HSC) निकालात यंदाही कोकण विभाग आणि राज्यातून मुलींनी बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक 94.14 टक्के इतका लागला आहे.

     Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल

    1. कोकण - 94.14 टक्के 
    2. पुणे - 91.25 टक्के 
    3. अमरावती 90.92 टक्के
    4. मुंबई - 90.08 टक्के  
    5. नाशिक 90.72 टक्के 
    6. नागपूर - 88.67 टक्के
    7. छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के 
    8. कोल्हापूर 89.97 टक्के
    9. लातूर 84.14 टक्के 

    हेही वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर, ही घ्या Marksheet Download Direct Link