जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. त्यानुसार यंदा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल पाहायची Direct Link? 

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी results.digilocker.gov.in आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी 1 वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

निकाल घटला

बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला होता. 

मुलींनी मारली बाजी

    दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली, तर 86.80 टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या तुलनेत 6.35 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.

    ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल? (How to download your 12th-grade marksheet online?)

    • विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. 
    • पहिल्यांदा वरील वेबसाइट उघडा.
    • ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
    • ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
    • स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
    • ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.

    हेही वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर, mahahsscboard.in वर एका क्लिकवर असा पाहा निकाल

    HSC 12th Result 2026: DigiLocker द्वारे निकाल कसा तपासावा

    • DigiLocker वरून तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला (website) भेट द्या: www.digilocker.gov.in.
    • आता, संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर (homepage) असलेल्या 'VIEW RESULT' या विभागावर क्लिक करा.
    • त्यानंतर, 'Maharashtra Board 12th Result 2026' या दुव्यावर (link) क्लिक करा.
    • दुव्यावर क्लिक केल्यानंतर, विचारलेली आवश्यक माहिती भरा.
    • सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

    हेही वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल