जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र सरकारकडून कामाचे बिल न मिळाल्याने सरकारी कंत्राटदारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कंत्राटदार दक्षिणात्य अभिनेता प्रभास याचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे घटना?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कामांशी संबंधित असलेल्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कंत्राटदारावर मोठे कर्ज होते. याशिवाय सरकारकडून 40 कोटी रुपयांहून अधिक बिले थकलेले होते. कंत्राटदारला वेळेत न पैसे मिळाल्याने बँकांचे हफ्ते, मजुरांचे पगार आणि इतर कर्जफेड वेळेवर करता आली नाही. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक तणावाखाली आला होता.
प्रभासचा नातेवाईक असल्याची माहिती-
आत्महत्या केलेला कंत्राटदार दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना राज्याबाहेरही चर्चेत आली आहे. कंत्राटदार संघटनांनी यापूर्वीही वारंवार सरकारकडे थकीत बिलांच्या मुद्यावर आवाज उठवला होता. परंतु, अद्याप अनेक कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये सरकारकडे थकले आहेत. या आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहे.त्यामुळे अनेक जण टोकाचे पावले उचलत आहे.
दुसरी आत्महत्या !
ही घटना राज्यातील सलग दुसरी कंत्राटदार आत्महत्येची असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे आता कंत्राटदारही आत्महत्येला प्रवृत्त होत असतील, तर शासनाची आर्थिक व प्रशासकीय धोरणं कितपत प्रभावी आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकरी, कंत्राटदार आणि सामान्य जनता – सर्वांचं आर्थिक हालअपेष्टांमुळे जीवन असुरक्षित बनलं आहे, अशी टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली आहे.