जेएनएन, मुंबई: महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वरळी येथे गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या नव्या, विस्तारित मुंबई कार्यालयाचे उद्घाटन आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.   

मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोल्डमन सॅक्सच्या नव्या कार्यालयासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्वाला अधोरेखित करणारी आहे.

आमचे सरकार विकासासाठी कटिबद्ध असून, खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची केंद्र उभारण्यात येत आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची उभारली जाणार असून या ठिकाणी इनोवेशन हब उभारले जाणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधनाचीही सोय असेल. AI आधारीत व्यवस्था आणि संशोधन ही असेल. तिसरी मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू सोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी - शिवडी लिंक रोडी असेल. मुंबईच्या विकासाला आणखी चालना देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल. या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. खासगी आणि सरकारी भागीदारीतूनच चांगला विकास होतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या देण्याचे काम शासनस्तरावरून जलद पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी योगदान द्यावे

महाराष्ट्र ही गुंतवणूक स्नेही राज्य आहे. इज ऑफ ड्यूइंग बिसनेस साठी सध्या काम सुरू आहे. गुंतवणूकदारण कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी आम्ही काम करत आहोत. कोणतीही अडचण आल्यास ती तत्परतेने सोडवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.  

दशकांतील वाढीचा पुढचा टप्पा 

    गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर, म्हणाले की मुंबईतील हे नवे कार्यालय भारतात आमच्या दशकांतील वाढीचा पुढचा टप्पा आहे. भारतातील बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.