एजन्सी, गोंदिया - माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते महादेवराव सुखाजी शिवणकर (Mahadeorao Shivankar) यांचे सोमवारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात दीर्घ आजाराने निधन झाले, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली.

शिवणकर (85) यांनी पहाटे आमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचे पुत्र विजय शिवणकर यांनी सांगितले. 

ते आमगाव मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते आणि त्यांनी लोकसभेत चिमूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. या ज्येष्ठ नेत्याने भाजप शेतकरी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम केले.

गोंदिया जिल्ह्याचे शिल्पकार

शिवणकर यांनी 26 जानेवारी 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन आणि नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती जाहीर केली होती.

जोशी सरकारमध्ये अर्थमंत्री

    1990 च्या दशकात महाराष्ट्रातील मनोहर जोशी सरकारमध्ये राज्याचे सिंचन आणि अर्थमंत्री म्हणून Mahadeorao Shivankar यांनी काम पाहिले.

    शिवणकर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय आणि संजय शिवणकर आणि एक मुलगी असा परिवार आहे.

    मंगळवारी आमगाव येथील साखरीतला घाटावर अंत्यसंस्कार केले जातील आणि सकाळी 10 वाजता शिवंकर यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू होईल.

    मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

    भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. पूर्व विदर्भात भाजपाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते. विधानसभा, लोकसभेत त्यांनी सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने केले. शेती आणि सिंचन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. त्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. एक कर्मठ नेता म्हणून त्यांची ओळख होती. नक्षलग्रस्त भागाचा कायापालट व्हावा आणि तेथे विकास व्हावा, ही त्यांची तळमळ असायची, असं म्हणत त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

    हेही वाचा - Maharashtra Farmer Suicide: ‘दिवाळी आलीय, पण पोरांना कपडे घेण्यासाठी…’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने गळफास घेत संपवले जीवन

    शिवणकर पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळे कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प उभे राहू शकलेत. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली असून त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून संबोधले जातात.

    महादेवराव सुकाजी शिवणकर यांची एकूण वाटचाल जन्म 7 एप्रिल 1940 जन्मस्थळ आमगाव, जिल्हा गोंदिया, शिक्षण- एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(इतिहास) व्यवसाय शेतकरी (मूळ), माजी व्याख्याता (अर्थशास्त्र व इतिहास) भवभूती महाविद्यालय आमगाव (नागपूर विद्यापीठ संलग्र), 26 जुलै 1975 रोजी आणिबाणीकाळात तुरुगांत गेले. 

    राजकीय वाटचाल

    1978 ते 2008 पर्यंत निवडणुकीत अजिंक्य

    विधानसभा सदस्य 1978 ते 1989 ( तीन वेळा आमगाव विधानसभा)

    1994 ते 2004 (दोन वेळा आमगाव विधानसभा)

    कॅबिनेट मंत्री पाटबंधारे, वित्त व नियोजन (1999-2004)

    संसद सदस्य 1989 ते 1994 व 2004 ते 2008,

    2004 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत त्यांनी केली होती.

    पुस्तके -

    1. गजाआड (मराठी आणीबाणी काळातील डायरी) 
    2. भारताची आर्थिक स्थिती (मराठी) 
    3. विदर्भ झालाच पाहिजे (मराठी)
    4. केनिया सफारी (मराठी) , 
    5. शेतकऱ्यांच्या समस्यावर त्यांनी 100 च्या जवळपास लेख लिहिले होते.

    हेही वाचा - Mumbai Fire News: मुंबईतील चाळीत भीषण अग्नीतांडव, लहान मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी