मुंबई, १९ ऑगस्ट (एजन्सी) - रत्नागिरी जिल्ह्यातील पिंपळी येथील काळकाई मंदिर येथे सोमवारी रात्री थार, रिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात महिला व लहान मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये थार चालक, रिक्षा चालक, तसेच रिक्षातील प्रवासी पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एका भरधाव थार गाडीची ऑटोरिक्षा आणि ट्रकशी टक्कर झाल्याने एका मुलासह 5 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. सोमवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास रत्नागिरीतील कराड-चिपळूण रस्त्यावरील पिंपळी खुर्द गावात हा अपघात घडला.

पोलिसांनी सांगितले की, वेगाने येणाऱ्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलने (एसयूव्ही) एका ऑटोरिक्षाला धडक दिली, ज्यामध्ये एका मुलासह चार जण होते आणि तीनचाकी वाहन काही अंतरापर्यंत ओढले गेले.

त्यानंतर एसयूव्ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. असे अधिकाऱ्याने सांगितले.

ऑटो रिक्षातील चार प्रवासी आणि एसयूव्ही चालकाचा जागीच मृत्यू झाला.

इब्राहिम इस्माईल लोन (वय 65), नियाज मोहम्मद हुसेन सय्यद (वय 50), शबाना नियाज सय्यद (40), हैदर नियाज सय्यद (5) हे सर्व पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी आहेत आणि एसयूव्ही चालक आसिफ हकीमुद्दीन सैफी (२८, उत्तराखंड)  अशी मृतांची नावे आहेत.

    या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.