जेएनएन, मुंबई. Eknath Shinde Prayer in Siddhivinayak temple: सिद्धिविनायक मंदिराचा पूर्णविकासाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या पुनर्विकास प्रकल्पाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आज सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शन घेतले

मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या दादर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात उपस्थित राहून श्री गणेशाची मनोभावे पूजा करून त्याचे भक्तीभावाने दर्शन घेतले. तसेच या मंगल समयी श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त स्थानापन्न झालेल्या श्री गणरायाचेही दर्शन घेतले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आमदार तथा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच सिद्धिविनायक मंदिर समितीचे सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि गणपती बाप्पाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    रखडलेल्या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होणार

    आमचे सरकार विकासाच्या मागे  लागले आहे. सर्व प्रकल्प हे आम्ही मार्गी लावणार आहेत. जे प्रकल्प निवेदनांनी सोडून दिले आहेत ते म्हाडा, एसआरए च्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत. प्रत्येक रखडलेल्या प्रकल्पाचं काम करण्याचा आमचा मानस आहे, असं शिंदे म्हणाले.

    हेही वाचा -Beed News: सुरेश धस फोडणार पेनड्राईव्ह बॉम्ब, ‘अजित पवारांना पुरव्यांचे दस्तऐवज आणि तो पेनड्राईव्ह देणार’

    सरकार सर्व योजना सुरु ठेवणार 

    महानगरपालिकेकडे किंवा सरकारकडे कोणत्याही प्रकरणाच्या निधीची कमकरता नाही. सरकार सर्व योजना सुरु ठेवणार असून नवीन योजना आखणार आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.