जेएनएन, बीड. Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरले आहे. त्यांनी अनेक वेळा आरोप केले आहेत. यातच आता त्यांनी मोठा दावा केला आहे. पुराव्यांचे पेनड्राईव्ह अजित पवारांना देणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

पेनड्राईव्हमध्ये सर्वच पुरावे

अजित पवार यांना पुरव्यांचा पेनड्राईव्ह देणार आहे. या पेनड्राईव्हमध्ये सर्वच पुरावे आहेत. मी तथ्य नसल्याशिवाय बोलत नाही, आज दस्तऐवज आणि पेनड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे. जर यात तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती अजित पवार यांना करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. 

भविष्यातील योजनांचा घेतला आढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय सर्व विभाग प्रमुखांची व बीड जिल्हा समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेण्यात आला.

प्रत्येकानं जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात

    जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा यांसारख्या विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात, असं या निमित्याने अजित पवारांनी स्पष्ट केलं.

    बैठकीला यांची उपस्थिती 

    उपमुख्यमंत्री तथा Beed Guardian Minister अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. आजच्या या सभेस खा. रजनी पाटील, खा. बजरंग सोनवणे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विक्रमसिंह पंडित आदी नेते उपस्थित होते.