जेएनएन, नवी दिल्ली. New Delhi Assembly Election 2025 Results: दिल्लीतील 70 विधानसभा मतदार संघासाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजी निवडणूका घेण्यात आल्या असून, या निवडणुकांचा निकाल आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी घोषित केला जाणार आहे. मतमोजणीला आज 8 वाजल्यापासून सुरवात झाली असून, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील हा निकाला बाबतच्या प्रत्येक अपडेट आपल्याला येथे बघता येणार आहे.
नवी दिल्ली विधानसभा क्षेत्राच्या सर्व 14 राऊंडची मतमोजणी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे 4089 मतांनी पराभूत झाले आहेत. तर भाजपाचे उमेदवार प्रवेश साहिब सिंग वर्मा (PARVESH SAHIB SINGH) यांना 30088 मते पडली आहेत. त्यांनी 4089 मतांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांना 4568 मते मिळाली आहेत.
पक्ष | आम आदमी पक्ष | भाजप | काँग्रेस |
उमेदवार | अरविंद केजरीवाल | प्रवेश साहिब सिंग वर्मा | संदीप दीक्षित |
निकाल | 25999 ( -4089) | 30088 (+ 4089) | 4568 ( -25520) |