जेएनएन, मुंबई. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित (Uddhav Thackeray Dasara Melava Teaser) झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्वीटर अकांउट वर संबंधित व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला ‘विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा!’ या असे शिर्षक देण्यात आले आहे.
पक्षातील फूट
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यामुळे शिवसेनेचे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्ष निर्माण झाले आहेत. आता परंपरेनुसार उद्धव ठाकरे हे मुंबईत दसरा मेळावा होत आहे. यंदाही ठाकरे सेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे.
शिवतीर्थ साक्ष देतंय…
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 1, 2025
हिंदुत्वाच्या हुंकाराची
महाराष्ट्र रक्षणाच्या शपथेची
नव्या दमाच्या ठिणगीची!
ही साक्ष नव्याने अनुभवायला या!
दसरा मेळावा २०२५
विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा!
गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५
स्थळ - शिवतीर्थ, दादर
वेळ - सायं. ५.०० वा pic.twitter.com/wY551JcYXh
टीझरमध्ये काय?
'शिवतीर्थ साक्ष देतंय… हिंदुत्वाच्या हुंकाराची महाराष्ट्र रक्षणाच्या शपथेची नव्या दमाच्या ठिणगीची! ही साक्ष नव्याने अनुभवायला या! दसरा मेळावा 2025 विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा!' असं शिर्षक या टीझरच्या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
ठाकरे सेनेचा दसरा मेळावा कधी?
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा हा 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. सायंकाळी 5 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत.
ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे?
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा हा मुंबईतील दादर भागात असलेल्या शिवतीर्थावर होणार आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता काही दिवसांवर मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे या मेळाव्यात ते उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांची नजर लागली आहे.