जेएनएन, मुंबई. Corona Cases in Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या रोज वाढत आहे. राज्यात कोरोनाचे 86 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. काल राज्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 

 सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

राज्यात आरोग्य विभागाकडून कोरोनाचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणामध्ये रुग्णांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात कोरोनाचे केसेस जास्त नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

राज्यातील कोरोनाची आकडेवारी

कोरोना चाचणीची संख्या -8868 

जानेवारी ते आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण –  521

    कोरोनामुक्त रुग्ण – 132

    राज्यात काल सापडलेले रुग्ण – 86 

    कोणत्या शहरात किती रुग्ण

    • मुंबई: 36 रुग्ण
    • पुणे: 9 रुग्ण
    • पिंपरी चिंचवड: 3 रुग्ण
    • ठाणे: 24 रुग्ण
    • कल्याण: 2 रुग्ण
    • नवी मुंबई: 4 रुग्ण
    • पनवेल: 4 रुग्ण
    • नागपूर: 2 रुग्ण
    • अहिल्यानगर (अहमदनगर): 2 रुग्ण
    • रायगड: 1 रुग्ण

    राज्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 383 आहे.