जेएनएन, मुंबई. Rahul Gandhi Visit Dharavi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आगामी तीन दिवस मुंबई आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत, ते यावेळेत पक्षाच्या नेत्यासोबत बैठका घेणार आहेत.

धारावीतील कामगाराशी साधणार संवाद

लोकसभा खासदार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. ते धारावीला भेट देण्याची आणि तिथल्या लोकांना भेटण्याची शक्यता आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीतील लघु उद्योजकांना फटका बसत असल्यामुळे राहुल गांधी धारावीच्या कामगाराशी संवाद साधणार आहेत.

राहुल गांधी मुंबईतून जाणार अहमदाबादला

राहुल गांधी गुजरातेत काँग्रेस पक्षाच्या आजी माजी प्रदेश अध्यक्ष सोबत चर्चा करणार आहेत. तसंच, आजी माजी जिल्हाअध्यक्षसोबत चर्चा करणार आहे.

    राहुल गांधी घेणार बैठक!

    स्थानिक स्वराज संस्थाचे निवडणूक लढलेल्या आजी-माजी सदस्यसोबत चर्चा करणार आहे. महाविकास आघाडी सोबत स्थानिक स्वराज संस्थाची निवडणूक लढायची की नाही, यावर कार्यकर्ताचे मत राहुल गांधी जाणून घेणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.