जेएनएन, मुंबई. BMC Election 2026 latest news: काँग्रेस पक्षाने स्वबळाचा निर्णय घेत मुंबईत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या युतीच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने मुंबईतून महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील मुस्लिम मताचे मोठे विभाजन होणार आहे.
काँग्रेचच्या मतावर UBT चा डोळा
महाविकास आघाडीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळत होते. काँग्रेसचे मुस्लिम मते अनेक वेळा UBT ला मिळाले आहे. यामुळे माविआत फूट पडल्याने काँग्रेसला मिळणारी मुस्लिम मते विभाजली जाणार आहे, अशी चिंता काँग्रेसने व्यक्त केली आहे.
उत्तर भारतीय मते खेचण्याचा भाजपाकडून पर्यत
उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे यांची संभाव्य युती होत असल्याने UBT ला मिळणारी उत्तर भारतीय मते आता पूर्णपणे भाजपला मिळणार असल्याची चिंता ठाकरे गटाकडून केली जात आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपा पक्षाची चांदी ही चांदी आहे, असे मत राजकीय जाणकार यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे बंधू एकत्र?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना वेग येत असतानाच, त्याचा थेट परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून नाराजी व्यक्त झाली होती, त्यानंतर आता काँग्रेसनेही स्पष्ट भूमिका घेत मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - BMC Election 2026: महाविकास आघाडी बिघाडी! मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार
रमेश चेन्निथला केली घोषणा
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आगामी महापालिका निवडणुका, युती-आघाडीचे राजकारण आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना यावर सविस्तर चर्चा केली.चर्चा नंतर चेन्निथला यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा केली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. ही अस्वस्थता लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.
