जेएनएन, मुंबई. BMC Election 2025 Latest News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत लढणार यावर अंतिम निर्णय 7 जुलै रोजी काँग्रेस घेणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या भविष्यात पक्ष संघटना मजबूत करून निवडणूक लढण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठकीत चर्चा केली आहे. 7 जुलैला काँग्रेस पक्ष आघाडीबाबत अंतिम निर्णय  घेणार आहे.

काँग्रेसची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी?

काँग्रेस पक्षाला मुंबई महानगर पालिकाची सत्ता हवी आहे मात्र काँग्रेसला आघाडीत अनेक जागेवर तडजोड करावी लागणार आहे. यामुळे काँग्रेस पक्ष मुंबई महानगर पालिकाची निवडणूक (BMC Election 2025) स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

दिल्लीत काल पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यानी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागण्याचे आदेश दिल्ली हाय कमांडने दिले आहेत.