जेएनएन, मुंबई. BJP On BMC Election 2025: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 (BMC Election 2025 BJP Committee) मध्ये यशस्वीरित्या कामगिरी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, मुंबईने एक विशेष निवडणुकीचे व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कार्यवाही समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये अनुभवी नेत्यांचा समावेश असून, निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

या समितीच्या अध्यक्ष स्थानी हे भाजप मुंबईचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार हे असणार आहेत. त्यांच्या या समितीत 19 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. समितीमधील प्रमुख सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

भाजपाकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार

भाजपाची दादरमध्ये मॅरेथॉन बैठक

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाला जास्तीत जास्त यश मिळावे म्हणून नियोजनबद्ध कामं, संघटनेची रचना आणि निवडणूक काळातील प्रचार, प्रसार यादृष्टीने आवश्यक ती तयारी या सगळ्याचा विचार करण्यासाठी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात निवडणूक समितीची जवळपास सलग 6:30 तासांची पहिली मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत संपूर्ण निवडणुकीच्या आणि विजयाच्यादृष्टीने नियोजनाला सुरुवात केली. 

    अ. क्र.नावपद
    1ना. ॲड. आशिष शेलारअध्यक्ष, भाजप मुंबई
    2डॉ. किरीट सोमैयासदस्य
    3विजय (भाई) गिरकरसदस्य
    4प्रकाश मेहतासदस्य
    5मधू चव्हाणसदस्य
    6राज के. पुरोहितसदस्य
    7आ. कालिदास कोळंबकरसदस्य
    8आ. ॲड. पराग अलवणीसदस्य
    9आ. कॅप्टन तमिल सेलवनसदस्य
    10आ. राम कदमसदस्य
    11आ. पराग शाहसदस्य
    12आ. श्रीकांत भारतीयसदस्य
    13जयप्रकाश ठाकूरसदस्य
    14माधव भंडारीसदस्य
    15हाजी अराफत शेखसदस्य
    16राणी द्विवेदीसदस्य
    17संजय पांडेसदस्य
    18दिलीप पटेलसदस्य
    19अरुण देवसदस्य