जेएनएन, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. अंधेरी पश्चिमचे तीनवेळा आमदार राहिलेले अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी भाजपने आक्रमक चेहरा केला पुढे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून, ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी भाजपने आक्रमक चेहरा पुढे केला आहे. अमित साटम यांची आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे . यामुळे ठाकरे बंधूला अडचण ठरू शकते.साटमला संघटनात्मक   बांधणीचे कौशल्य असल्याने  भाजपने ही जबाबदारी दिली आहे.नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या साटम यांना "स्पीकिंग एमएलए" अशी ओळख मिळाली आहे.

तीन वेळा आमदार

2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन निवडणुकांत त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याआधी ते नगरसेवक राहिले असून, युवक संघटनांमधून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. जुहू बीचचे सुशोभीकरण, नागरी सोयीसुविधांसाठी लढा आणि कोविड काळातील उपक्रमांमुळे त्यांची वेगळी छाप निर्माण झाली आहे.

भाजप मुंबई महापालिकेत नवा रेकॉर्ड घडवेल

    मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होताच पक्षात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे विश्वास फडणवीस यांनी  व्यक्त केला आहे. साटम यांच्यानेतृत्वाखाली भाजप मुंबई महापालिकेत नवा रेकॉर्ड घडवेल, असेही फडणवीस म्हणाले आहे.