जेएनएन, मुंबई. राज्यातील महायुती सरकारने अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) रिक्त असलेल्या तब्बल 10 हजार जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नोकरीची वाट पाहात असलेल्या व प्रलंबित असलेल्या अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

15 सप्टेंबरपर्यंत जागा भरल्या जाणार -

राज्यात 10 हजार अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावरील चतुर्थ श्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत. राज्यात जवळपास 9,658 जागा अनुकंपा तत्वावर जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती 15 सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. या निर्णयामुळे सुमारे प्रतीक्षेत असलेल्या 10 हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

उमेदवारांना स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सरकारी नोकरीची ही संधी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ही प्रक्रिया येत्या 15 सप्टेंबर 2025 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे.

अनुकंपा तत्वावर नोकरी म्हणजे काय?

राज्यातील सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये  कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी दिली जाते, याला अनुकंपा धोरण म्हणतात. अनुकंपा धोरण 1973 पासून लागू आहे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या धोरणानुसार गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही सवलत मिळते. अशातच राज्यात अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या. महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरभरती केली जाते.