जेएनएन, मुंबई. Ajit Pawar Sanjay Raut : महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देता, अवैध मुरुम उत्खनन माफियाला पाठीशी घालता, कुठे गेली तुमची शिस्त मिस्टर अजित पवार, तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केली आहे. नियमबाह्य काम करणाऱ्या लोकांना पाठीशी घातला आणि अधिकारीला दमदाटी करता अशी टीका राऊत यांनी केली आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. या वादाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्यानंतर पवारांनी त्या महिला अधिकाऱ्याला फडकारले होते..
काय आहे प्रकरण -
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच त्या कारवाईसाठी गावात दाखल झाल्या. तेथे त्यांचा ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) फोन केला व फोन कृष्णा यांच्या हातात दिला. त्यावेळी कृष्णा यांनी सांगितले की, तुम्ही कोण बोलता हे समजत नसून माझ्या फोनवर कॉल करा. त्यानंतर अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. तुमच्यात इतके धाडस कुटून आले, ताबडतोब कारवाई थांबवा, हा माझा आदेश असल्याचे सांगत पवारांनी महिला अधिकाऱ्यावर कारवाईची धमकी देताना या दिसतात. या संभाषमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अजित पवारांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत नैतिकतेच्या कृष्टीने सरकारमधून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांची टीका !
या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर थेट हल्ला चढवला आहे. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अनेक जणांना राजीनामे द्यावे लागले आहेत, असे त्यांनी म्हटले.
ज्या अधिकाऱ्याने अवैध उत्खननाविरोधात कारवाई केली, त्यांनाच उपमुख्यमंत्री धमकावतात, हे राज्यासाठी लज्जास्पद आहे, अशी टीका राऊतांनी केली.
सरकारमध्ये राहण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही,असे म्हणत त्यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता. तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण आहे हे सांगण्यासाठी दमबाजी केली जाते. मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? बेकायदेशीर मुरूमाचे प्रकरण म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणे आहे. तुम्ही अर्थमंत्री आहात.