मुंबई - Lalbaugcha Raja Ganesha Visarjan 2025 : ही शान कोणाची लालबागच्या राजाची, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणांनी व गुलालाची उधळण आणि ढोल-ताशे फटाक्यांच्या आतबाजीत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा यंदा शनिवार, 6 सप्टेंबर रोजी भाविकांना निरोप देणार आहे. 11 दिवसांच्या जल्लोषपूर्ण उत्सवानंतर लाखो भक्तांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मुंबईतील सर्वांत लांब आणि सर्वांत प्रतिष्ठित मानली जाते. लालबाग ते गिरवाग चौपाटीपर्यंत जायला मिरवणुकीला 22 ते 24 तासांचा वेळ लागतो. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या स्वरात आणि हजारो अनवाणी चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत ही विसर्जन मिरवणूक पुढे सरकते. या आपल्या लाडक्या नवसाला पावणाऱ्या राजाचे शेवटचे दर्शन पुढील टप्प्यात घेऊ शकता.
लालबागचा राजा विसर्जन मार्ग-
लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) दुपारी 1 ते 2 या वेळेत राजा चिंचपोकळी रेल्वे पुलावर पोहोचेल.
भायखळा स्टेशन (पश्चिम) : डेलिसल रोडपासून S-ब्रिज ओलांडत मूर्तीचा पुढील प्रवास.
हिंदुस्तान मशीद, भायखळा : सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक मानला जाणारा हा थांबा. येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून दरवर्षी मूर्तीचे स्वागत केले जाते.येथे दरवर्षी बाप्पांचा थांबा असतो.
भायखळा अग्निशमन दल -
नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक) : रंगेबिरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा मोठा टप्पा
गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र : गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह ऐतिहासिक परिसर.
ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) : येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक शेवटच्या टप्प्याकडे जाते.
गिरगाव चौपाटी : 'पुढच्या वर्षा लवकर या' म्हणत दुसऱ्या दिवशी पहाटे अरबी समुद्रात बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो.त्यानंतर अखेरचा टप्प्यात गिरगाव चौपाटीवर 7 सप्टेंबरच्या सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन अरबी समुद्राच्या होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचा हा क्षण अत्यंत भावनिक असतो.
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 10 ते 11 या वेळेत मंडळाच्या जागेतून होईल. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात राजाचा प्रवास सुरू होईल. या ऐतिहासिक ठिकाणी पूल आणि खाली दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते.
हेही वाचा: LIVE Ganesh Visarjan 2025:गणपती बाप्पा मोरया! गणेश गल्लीचा राजा विसर्जन मिरवणुकीत सहभागी
हेही वाचा:Anant Chaturdashi 2025 : गणेश विसर्जनासाठी मुंबईत 21 हजार पोलीस कर्मचारी, 10 हजार सीसीटीव्ही, ड्रोन व पहिल्यांदाच AI चा वापर!