जेएनएन, मुंबई: गुजरातेत अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे एक प्रवाशी विमान कोसळले आहे. यात एकुण 242 प्रवाशी होते. सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहेत. या दुर्घटनेनंतर विविध राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना ऐकून धक्काच बसला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

घटनेबद्दल जाणून दुःख झाले

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांच्या विमानातील घटनेबद्दल जाणून दुःख आणि धक्का बसला. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असं त्यांनी आपल्या एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे.

विमान अपघात अतिशय धक्कादायक 

अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात अतिशय धक्कादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. गुजरात प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य करत असून विमानातील वाचलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या भयंकर दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मन हेलावून टाकणारी घटना 

    गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

    अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला, दुःख झाले. या दुर्घटनेत वाचलेल्यांच्या आणि त्या विमानातील सर्वांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. असं म्हणतं आपण सर्वांसाठी आशा आणि प्रार्थना करूया असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.