जेएनएन, अहमदाबाद. Ahmedabad Plane Crash Today: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले आहे. या विमानात एकूण प्रवासी 242 प्रवाशी होते. यात वैमानिक 2, केबिन क्रू 10, प्रवासी 230 होते. या विमानाला कॅप्टन सुमित सभरवाल (एलटीसी, 8200  तासांचा अनुभव) हे चालवत होते. तर फर्स्ट ऑफिसर म्हणून क्लाईव्ह कुंदर (1100 तासांचा अनुभव) हे काम करत होते. अशी माहिती डीजीसीए यांनी आपल्या निवेदन दिली आहे. 

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विमान कोसळताना दिसत आहे. विमान जमीनीवर कोसळताच मोठा आवाज होत असून मोठी आग लागल्याचे दिसत आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "सुरुवातीच्या काळात आम्हाला कळले की लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहात कोसळले आहे. 2-3 मिनिटांत पोलिस आणि इतर एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. जवळजवळ 70-80% परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. सर्व एजन्सी येथे काम करत आहेत..."

या अपघातामागे प्राथमिक स्थितीत अद्याप कोणतेही निश्चित कारण नाही, तपास सुरू आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्य सुरू आहे, असं डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटलं दिली आहे. 

हेही वाचा - Ahmedabad plane crash: लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर 5 मिनिटांतच कोसळले; अहमदाबादच्या आकाशात धुराचे साम्राज्य!

बचाव कार्य युद्धपातळी सुरु

    अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बी787 ड्रीमलायनर विमान, फ्लाईट एआय 171, अपघातस्थळी सर्वत्र कचरा पसरलेला आहे. बचावकार्य सुरू आहे आणि अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे.

    हेही वाचा - Corona Cases In Maharashtra: राज्यात कोरोनाचा हाहाकार, रुग्णांची संख्या पोहोचली 1,700 वर तर 21 जणांचा मृत्यू