जेएनएन, मुंबई. Aaple Sarkar Portal: ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी 10 ते 14 एप्रिल, 2025 अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे 

या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

'आपले सरकार' पोर्टल 5 दिवस बंद

'आपले सरकार' पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी 10 ते 14 एप्रिल, 2025 अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत आपलेसरकार सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध नसेल, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) द्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती डीजीपीआयआर द्वारे देण्यात आली आहे.

    आपले सरकार पोर्टलची काही प्रमुख वैशिष्ट्ये:

    ऑनलाइन सेवा: या पोर्टलवर नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामध्ये दाखले, परवाने, योजनांसाठी अर्ज इत्यादींचा समावेश आहे.

    माहितीचा स्रोत: शासकीय योजना, नियम, कायदे आणि इतर माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे.

    तक्रार निवारण: नागरिक या पोर्टलच्या माध्यमातून शासकीय विभागांकडे तक्रारी नोंदवू शकतात आणि त्यांच्या तक्रारींची स्थिती तपासू शकतात.

    पारदर्शकता: या पोर्टलमुळे शासकीय कामांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होते.

    सुविधा: हे पोर्टल नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये न जाता घरबसल्या काम करण्याची सुविधा देते.

    आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या सेवा:

    • जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र
    • डोमिसाइल सर्टिफिकेट, उत्पन्न प्रमाणपत्र
    • विविध शासकीय योजनांसाठी अर्ज
    • जमिनीच्या नोंदी
    • तक्रार नोंदणी आणि पाठपुरावा

    हेही वाचा - Maharashtra Heat Wave: राज्यात तापमान वाढलं, हे शहर आहे सर्वात उष्ण, पोहोचलं 44.2 अंशांवर