जेएनएन, मुंबई. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी करण्यात आलेल्या 4 लाख 7 हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठा बुस्टर मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. 

पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार 

MMR क्षेत्रामध्ये मोठी आर्थिक क्षमता असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकट्या MMR क्षेत्रामध्ये दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. तसेच युनिलिव्हर कंपनी सोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत. या करारामुळे या संधीमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet: नवीन वाळू धोरणासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 9 मोठे निर्णय, वाचा सविस्तर…

4 लाख 7 हजार कोटींचे करार

 ग्लोबल फोरम 25 च्या वेळी पुढीलप्रमाणे करार करण्यात आले आहेत. MMRDA आणि HUDCO यांच्या मध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी दीड लाख कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच आर ई सी सोबत एक लाख कोटी, पी एफ सी सोबत एक लाख कोटी, आय आर एफ सी ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत एक लाख कोटी आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रकचर अँड डेव्हलपमेंट यांच्या सोबत 7 हजार कोटींचा असे एकूण 4 लाख 7 हजार कोटींचे करार करण्यात आले.

    पुण्यात 900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

    युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कापॅबिलिटी सेंटर पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करार ही आज करण्यात आला. या केंद्रामध्ये 900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 500 रोजगार उपलब्ध होणार आहेत.

    हेही वाचा - Maharashtra News: औरंगाबाद, उस्मानाबाद, नगरनंतर आता या शहराचं नाव बदलून होणार रत्नपूर, मंत्र्यांची माहिती