जेएनएन, मुंबई. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला शहर आज राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे कमाल तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्या पाठोपाठ आता अमरावतीमध्ये ही तापमानाचा पारा चढला असून तो 43.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
गरम वाऱ्यांमुळे तापमानात वाढ
पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडील भागातून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा - वाढत्या उष्णतेवर मात करतात हे 5 पेये, डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही देखील आहारात करा वापर
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
- अकोला: 44.2
- पुणे: 41.0
- अहिल्यानगर : 40.1
- जळगाव: 42.5
- नाशिक: 40.3
- सोलापूर: 42.0
- परभणी: 42.1
- अमरावती: 43.6
- बुलढाणा: 40.4
- चंद्रपूर: 43.6
- नागपूर: 42.4
- वर्धा: 42.0
- यवतमाळ: 42.0
- छत्रपती संभाजी नगर : 41.0
- गोंदिया - 40.6
- मुंबई - 33.6
हेही वाचा - उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी, उष्माघात टाळण्यासाठी लक्षात ठेवा या 7 गोष्टी