जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे 6 निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता 339 पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यासह नगर विकास, मदत व पुनर्वसन, आणि गृहनिर्माण विभागांच्या निणर्यांचा समावेश आहे.

सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ निर्णय 

  • महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
  • गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखणार. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती.

हेही वाचा - BMC Election जाहीर होताच ‘शिवाजी पार्क’ साठी रस्सीखेच; एकनाथ शिंदे विरोधात ठाकरे बंधू मैदानात!

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेने दिला धनादेश

    दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि.' यांच्यावतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, अमोल राडेवाट आणि अक्षय कर्डिले यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.

    हेही वाचा - BMC Election 2026: महायुतीत जागावाटपावरून तणाव; शिवसेनेची 125 जागांची मागणी, भाजपचा 60 जागांचा प्रस्ताव!