जेएनएन, मुंबई. Mahanagar Palika Election 2026 Latest News: राज्यात मागील काही वर्षापासून प्रलंबीत असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. येत्या 15 जानेवारीला सर्वत्र मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, येत्या मंगळवार 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 

उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी येत्या 31 डिसेंबरला करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 असून, येत्या 3 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर येत्या 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा (Municipal Corporation Election Important Dates)

  • नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी – 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026
  • अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
  • मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
  • मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026

हेही वाचा - Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना–मनसे युतीबाबत हालचालींना वेग; जागावाटप अंतिम टप्प्यात

तुम्हाला हे माहिती आहे का?

    मतदान प्रक्रिया काय आहे?

    • निवडणुका अधिकाऱ्यांच्या पदानुक्रमाद्वारे घेतल्या जातात, ज्यात समाविष्ट आहे:
    • निवडणूक अधिकारी आणि रिटर्निग अधिकारी
    • मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी
    • सहाय्यक कर्मचारी: सहाय्यक निवडणूक अधिकारी, निवडणूक पर्यवेक्षक, निरीक्षक, लिपिक
    • जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रभाग सीमा निश्चित करणे, प्रमाणित प्रभागनिहाय मतदार याद्या प्रकाशित करणे आणि मतदानापासून निकाल जाहीर होण्यापर्यंत निवडणूक प्रक्रियेवर देखरेख करणे ही कर्तव्ये आहेत.

    आदर्श आचारसंहिता (MCC) म्हणजे काय? 

    • एमसीसी  Model Code of Conduct ही निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे. निवडणुकीच्या घोषणेसह ते अंमलात आले. या काळात नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन मदत वगळता या क्षेत्रांमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत.

    हेही वाचा - Maharashtra Local Body Election Date: राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि निकाल या दिवशी, सविस्तर माहिती