जेएनएन, मुंबई: Highlights Maharashtra Budget Session 2025: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज 10 मार्च रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प होता. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प साद केला.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. (Maharashtra Budget 2025 highlights)

जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) अर्थसंकल्प सादर केला आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे नेहमीच त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असतात. 

  • 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 
  • 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. 
  • कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. 

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे या अधिवेशनात कोणत्या निर्णयासाठी काय तरतुदी होतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पातून सामान्य जनतेच्या अपेक्षा

  • शेतकरी सन्मान निधीत वाढ होणार का?

भाजपने निवडणुकीच्या काळात नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढू करू, असे आश्वासन दिलेच होते. तर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याच्या 6 हजारांवरून 9 हजार रुपये करू, असे सांगितले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत 3 हजार रुपये वाढ करण्याची घोषणा करू शकतात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6 हजार आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6 हजार, असे एकूण 12 हजार रुपये मिळतात. 

  • कर्जमाफीची घोषणा होणार का?

शेतकऱ्यांना महत्वाची अपेक्षा आहे ती कर्जमाफीची. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. सरकारने आपला शब्द पाळावा, याची आठवण विधिमंडळात केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारही करून देत आहेत. त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात अजितदादांनी कर्जमाफी जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

  • लाडक्या बहिणांच्या हफ्त्यात वाढ होणार का?

महायुतीचे सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या प्रभावावर निवडूण आलं असं म्हटल्या जातं. या योजनेचा हफ्ता हा 1500  रुपयांवरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन हे सरकारनं निवडणुक काळात दिलं होतं. त्यामुळे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात या निधीमध्ये वाढ करण्याची कोणती घोषणा होते का, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

  • 2025-03-10 16:20:31

    मराठी भाषा विभागास 225 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित

    सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास 3 हजार 159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागास 2 हजार 899 कोटी रुपये, मराठी भाषा विभागास 225 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
  • 2025-03-10 15:49:34

    Abhijat Marathi Bhasha sanman Day: 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून होणार साजरा

    भावफुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळुन तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून अशा मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाष‍िकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत.
  • 2025-03-10 15:16:28

    Maharashtra Budget 2025 Update: जलपर्यटन प्रकल्पासाठी विशेष तरतुद

    कोयनानगरयेथे स्कायवॉकची उभारणी व नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. हेळवाक येथे कोयना जलपर्यटन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे.
  • 2025-03-10 15:13:30

    Maharashtra Budget 2025: ठाणे, रायगडमध्ये 200 खाटांचं, रत्‍नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्‍णालय

    ठाण्यात 200 खाटांचं, रत्‍नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचं संदर्भ सेवा रुग्‍णालय आणि रायगड जिल्ह्यात 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्‍णालय उभारण्यात येणार आहे.
  • 2025-03-10 15:06:33

    Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद

    लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल असेल. पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभे करणार.
  • 2025-03-10 15:05:57

    Maharashtra Budget 2025 Update: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी 255 कोटी रुपयांचा निधी

    मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरविण्यात येत आहे. डिसेंबर, 2024 अखेर 7 हजार 978 कोटी रूपयांची वीज सवलत या योजनेव्दारे देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • 2025-03-10 14:59:43

    Maharashtra Budget 2025 Highlights: कृषिसह विविध विभागांसाठी भरीव निधीची घोषणा

    सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता कृषि विभागास 9 हजार 710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागास 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागास 4 हजार 247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागास 16 हजार 456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 638 कोटी रुपये, रोहयो विभागास 2 हजार 205 कोटी रुपये,सहकार व पणन विभागास 1 हजार 178कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा विभागास 526 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
  • 2025-03-10 14:58:04

    प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 साठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी

    प्रधानमंत्री आवास योजना, शहरी- 1 अंतर्गत 4 लाख 42 हजार 748 घरकुले मंजूर असून त्यापैकी 2 लाख 8 हजार 304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना - शहरी 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 5 लाख घरकुलांचे उद्दीष्ट असून त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • 2025-03-10 14:54:58

    जलजीवन मिशन योजनेसाठी 3 हजार 939 कोटी रुपये नियतव्यय

    जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 30 लाख कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता 3 हजार 939 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 37 हजार 668 कोटी रुपये आहे.
  • 2025-03-10 14:53:25

    आनंदवनसाठीच्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ

    स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने “आनंदवन”ला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे.
  • 2025-03-10 14:51:33

    Maharashtra Budget 2025: सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना

    पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून आतापर्यंत 1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर उर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरु करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70 टक्के वीज ग्राहकांचे वीजबील टप्प्या टप्प्याने शून्यावर येईल.
  • 2025-03-10 14:51:45

    Maharashtra Budget Highlights 2025: घरकुल योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ

    “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 44 लाख 7 हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - 2 अंतर्गत सन 2024 -25 करिता 20 लाख घरकुलांच्या उद्दीष्टापैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी दिली असून 14 लाख 71 हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.
  • 2025-03-10 14:47:18

    तळेगाव ते चाकण रस्त्यासाठी प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपयांचा निधी

    पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • N/A

    पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • 2025-03-10 14:43:18

    Maharashtra Budget 2025: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित

    नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7 हजार 201 गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
  • 2025-03-10 14:41:49

    येत्या 5 वर्षांत एकूण 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार- अजित पवार

    मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
  • 2025-03-10 14:38:24

    Maharashtra Budget Update: गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 1 हजार 460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित

    सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसंच, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि सन 2025-26 करिता 1 हजार 460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
  • 2025-03-10 14:34:06

    Maharashtra Budget 2025 Live Updates: महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे कामे प्रगतीपथावर

    पवना ते पात्रादेवी हा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग 760 किमी लांबीच्या असून त्यासाठी 86 हजार 300 कोटी किमतीच्या भूसंपादनाची कामे प्रगतीपथावर आहेत.
  • 2025-03-10 14:34:16

    Maharashtra Budget 2025 Live - खोपोली ते खंडाळादरम्याच्या मिसिंग लिंकचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळादरम्याच्या मिसिंग लिंकचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण केलं जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होईल
  • 2025-03-10 14:29:59

    नवे उद्योग स्थापन करण्यासाठी मैत्री संकेतस्थळावरून सेवा

    गुंतवणूकदार आणि उद्योजकांना पूरक परिससंस्था विकसीत करण्यासाठी जुलै 2023 मध्ये कायदा लागू केला आहे. नवे उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवा मैत्री संकेतस्थळावरून देण्यात येत आहे.
  • 2025-03-10 14:30:56

    Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाइल मिशनची स्थापना करणार

    महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाइल मिशनची स्थापना करणार, विदर्भात कापूस उत्पादनात वाढीसाठी मदत होईल.
  • 2025-03-10 14:29:03

    Maharashtra Budget 2025: नवी मुंबईत इनोव्हेटिव्ह सिटी होणार

    नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईत इनोव्हेटिव्ह सिटी उभारण्यात येत आहे.
  • 2025-03-10 14:27:04

    Deputy CM Ajit Pawar Budget Speech: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एप्रिल 2025 पासून सुरु करण्याचा मानस

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एप्रिल 2025 पासून सेवा सुरु करण्याचा मानस आहे. - अजित पवार
  • 2025-03-10 14:23:58

    Unnat Marg: ठाणे ते मुंबई असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार

    ठाणे ते मुंबई असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. याचा फायदा डोंबीवली, पालघर, भिवंडी या उपनगरांना फायदा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
  • 2025-03-10 14:23:53

    Maharashtra Budget 2025 LIVE Updates in Marathi: 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू होणार

    76 हजार कोटींचं वाढवण बंदर असून त्यातील राज्याचा वाटा 26 टक्के आहे. पर्यटनाला बंदर करातून सूट देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले.
  • 2025-03-10 14:19:14

    Ajit Pawar - बंदर विकासासाठी शुल्कामध्ये सूट

    बंदर विकासासाठी शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे. तसंच, बंदरांच्या करारांचा कालावधी वाढवून 90 वर्षे करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडियाहून ते एलिफन्टा लेणी दरम्यानच्या अत्याधुनिक बोटीच्या जलवाहतुकीसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर केलं जाईल, अशी पवार यांनी घोषणा केली.
  • 2025-03-10 14:15:12

    Maharashtra Budget News - नागपूरमध्ये अर्बन हाटची स्थापना करण्यात येणार

    नागपूरमध्ये अर्बन हाटची स्थापना करण्यात येणार आहे – अजित पवार यांची घोषणा
  • 2025-03-10 14:10:36

    Ajit Pawar - नव्या औद्योगिक धोरणातून 50 लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट

    नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर केलं जाईल. त्यातून 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
  • 2025-03-10 14:08:41

    Maharashtra Budget Session 2025: महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही

    महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
  • लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो - अजित पवार

    लाडक्या बहिणी मिळाल्या, धन्य झालो कोटी बारा जणांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून पुन्हा आलो, पुन्हा आलो... अशी कविता अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सादर केली.
  • 2025-03-10 13:53:55

    Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे विधानसभेत पोहोचले

    शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले.
  • 2025-03-10 13:48:21

    Maharashtra Budget Session 2025: अजित पवार विधानसभेत पोहोचले

    उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत पोहोचले.
  • 2025-03-10 13:45:34

    Ajit Pawar on Budget 2025: अर्थसंकल्प महायुतीचा, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा!

    अर्थसंकल्प महायुतीचा, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा! असं ट्वीट करुन अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
  • 2025-03-10 13:44:00

    Ajit Pawar: अर्थसंकल्पाच्या संदर्भात आवश्यक ती अंतिम चर्चा

    अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माझे सहकारी राज्यमंत्री यांच्यासह वित्त व नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अर्थसंकल्पाच्या संदर्भात आवश्यक ती अंतिम चर्चा केली.
  • 2025-03-10 12:28:14

    BJP MLA Sudhir Mungantiwar On Maharashtra Budget: जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने फक्त एका वर्षात पूर्ण होऊ शकत नाहीत

    "जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने फक्त एका वर्षात पूर्ण होऊ शकत नाहीत. सरकार पाच वर्षे चालण्यासाठी आहे. जर आपण एका विद्यार्थ्याला तीन तासांची परीक्षा देऊन उत्तरपत्रिका दिली आणि नंतर फक्त तीन मिनिटांत त्यांची उत्तरपत्रिका काढून घेतली, तर ते तसे चालणार नाही, त्याप्रमाणे सरकार येत्या पाच वर्षात दिलेले आश्वासने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येतील" असं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
  • 2025-03-10 12:15:58

    Devendra Fadnavis : विधानसभेत भारतीय टीमचा अभिनंदन प्रस्ताव

    भारतीय टीमनं चॉम्पियन टॉफी 2025 मध्ये अंजिक्य विजेते पद मिळवले आहे. यानिमित्तानं अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमतानं संमत करण्यात आल्याची माहिती दिली.
  • 2025-03-10 11:45:14

    Ram Kadam On Maharashtra Budget 2025: हे बजेट प्रत्येक घटकाच्या हिताचे रक्षण करणारे असेल

    "हे बजेट महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या हिताचे रक्षण करणारे असेल, मग ते शेतकरी असोत, तरुण असोत, कामगार असोत किंवा महिला असोत. हे सर्वसमावेशक बजेट असेल जे सर्वांसाठी काम करेल..." असं भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
  • 2025-03-10 11:39:49

    Maharashtra Budget Session: कांदा प्रश्न अधिवेशानात पेटला

    कांदा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाव पडण्याची शक्यता आहे, असा प्रश्न उपस्थीत करुन रोहित पवार आणि छगन भुजबळ यांनी त्याकडे लक्ष वेधले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे जाऊन हा प्रश्न कायमचा सोडवून असं आश्वासन दिलं आहे. तसंच, काही आमदारांनी सोयाबीन पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यावरही तोडगा काढण्याचा सभागृहात अनेकांनी प्रश्न उपस्थीत केला.
  • 2025-03-10 11:11:29

    Maharashtra budget 2025-26: मुख्यमंत्री विधानसभेत पोहोचले

    अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन यांच्यासह अन्य कार्यकर्ते व नेते होते. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
  • 2025-03-10 11:01:47

    Maharashtra Budget 2025 Update : रोहित पवारांनी अर्थसंकल्पापूर्वी सरकारला करुन दिली घोषणांची आठवण

    आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देणं क्रमप्राप्त आहे. या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. • लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रु. • महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांची पोलीस भरती. • शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15 हजार रु. • MSP वर 20 टक्के अनुदान. • वृद्धांना महिन्याला 1500 रुपये वरून 2500 रुपये. • अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रु. मानधन आणि विमा संरक्षण. • 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती. अशा विविध घोषणांची रोहित पवारांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारला ट्वीट करुन आठवण करुन दिली आहे.
  • 2025-03-10 10:46:16

    maharashtra budget 2025 : दिलेली आश्वासने पूर्ण करावीत - रोहित पवार

    आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे की निवडणुकीदरम्यान लोकांना दिलेली आश्वासने, जसे की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी... आणि महिलांची मदत 1500 वरून 2100 करण्याचे आश्वासन हे पूर्ण करावेत, ही अपेक्षा आहेत, असं राष्ट्रवादी-एससीपीचे आमदार रोहित पवार म्हणाले.
  • 2025-03-10 09:36:21

    Ajit Pawar - अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार

    राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील.
  • 2025-03-10 07:07:55

    Maharashtra Budget 2025 Highlights : हा अर्थसंकल्प लोकांसाठी - एकनाथ शिंदे

    महाराष्ट्राच्या 2025 च्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "हा अर्थसंकल्प लोकांसाठी आहे, हे सरकार लोकांसाठी आहे. आम्ही मागील अडीच वर्षात लोकांसाठी काम केले. आम्ही लोकांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काम केले. तसंच, पुढील पाच वर्षांतही असेच काम केले जातील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.