मुंबई. Ladki Bahin Yojana eKYC: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. ही योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाली असून ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. सुरुवातील सरसकट महिलांना लाभ दिल्यानंतर सरकारला जाणवले की, निकषात न बसणाऱ्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच योग्य लाभार्थ्यांंपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी ईकेवायसी सक्तीची करण्यात आली.
या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in यावर ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 18 सप्टेंबर पासून ईकेवायसीची प्रक्रिया सुरू झाली होती. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. सरकार याची मुदत वाढवेल अशी शक्यता होती, मात्र सरकारकडून याबाबत काहीच स्पष्टीकरण न आल्याने ईकेवायसीची मुदत संपली आता आहे. पण ज्या महिलांनी ईकेवायसी केली नाही त्यांचं काय होणार? त्यांना लाभ मिळणार का?
योजनेची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती, त्यानंतर योजनेची मुदत वाढवल्याची कोणतीही माहिती समोर न आल्याने ई- केवायसी वेळेत पूर्ण न केलेल्या अंदाज 30 ते 40 लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नाव या योजनेच्या यादीमधून वगळण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यातील 1 कोटी 80 लाख महिलांनीच या योजनेसाठीची केवायसी पूर्ण केली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी केली त्यांचे पैसे नियमितपणे सुरू राहणार आहेत.
मात्र वारंवार सूचना देऊनही तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे केवायसी न केलेल्या, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांना 'अपात्र' ठरवले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाला मुकावे लागू शकते.
सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी केली आहे आणि त्या नियमात, निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी ईकेवायसी केले नाही त्यांची नावे योजनेतून वगळली जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेच्या जवळपास अडीच कोटींच्या जवळपास लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीय. अजूनही 30 ते 40 लाख केवायसी झालेली नाही. त्यांचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे.
