जेएनएन, बीड. Santosh Deshmukh Murder Case Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायलयीन खटल्याची आज पहिली सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सुरक्षेच्या कारणामुळे व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते.
सीडीआरची मागणी
वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवादला सुरुवात केला. यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली. आरोपीचे कुठलेही जबाब मिळाले नसल्याचा सीडीआरची मागणी बचाव पक्षाचे वकील राहुल मुंडेंनी केला आहे.
सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील युक्तिवाद केला. सरकारी वकिली आपले म्हणणे 26 मार्चला मांडणार आहे. न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे.
काय झाले न्यायालयात !
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच मुख्य आरोपी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. सीआयडीने 1400 पानाचे विशेष न्यायलयात दाखल केलेल्या आरोपत्रात वाल्मिक कराड यांचे नाव आहेत. आज सरकारी बाजूचे वकील उज्वल निकम उपस्थित राहिले नसून सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली आहे.
कागदपत्रे मिळण्याबाबत आज आम्ही मागणी केली
हत्या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्रे आहे, ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे अशी मागणी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी केली आहे. कागदपत्रे मिळण्याबाबत आज आम्ही मागणी केली आहे, ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळणार आहे, अशी माहिती वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Thane Fire News: कल्याणमधील रिव्हरडेल इमारतीला आग, दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
वाल्मिक कराडने वकील बदलला!
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आज पार पडली. या प्रकरणात वाल्मिक कराडने आपला वकील बदलला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू विकास खाडे यांनी मांडली. अशोक कवडे यांनी आतापर्यंत वाल्मिक कराडची वकील म्हणून बाजू मांडली होती. मात्र यापुढे कोल्हापूरमधील वकील विकास खाडे हे वाल्मिक कराडचे काम पाहणार आहेत.