एजन्सी, छत्रपती संभाजीनगर. Nanded Accident Update: नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी शेतात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळल्याने 7 महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला, त्यापैकी दोन 18 वर्षांच्या होत्या आणि तिघांना वाचवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी (डीआयओ) प्रवीण टाके यांनी दिली आहे.
ट्रॉली पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली
लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आसेगाव गावात सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रॉली रस्त्यावर उलटून पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली, असे त्यांनी सांगितलं. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आणि विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर काढले, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Farmer Suicide in Amaravati: हा अकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल! अमरावती विभागात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या
7 महिलांचे मृतदेह बाहेर काढले
बचाव कार्याच्या शेवटी, विहिरीतून 7 महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर इतर तिघांना वाचवण्यात आले, असे डीआयओ यांनी सांगितले. "या महिला शेतात हळद काढण्यासाठी जात होत्या. मृत सर्व जण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तहसीलमधील गुंज गावातील आहेत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मृतांची ओळख पटली आहे, मृतांमध्ये ताराबाई सतवाजी जाधव (35), धृपता सतवाजी जाधव (18), सरस्वती लखन बुरड (25), सिमरन संतोष कांबळे (18), चैत्रबाई माधव पारधे (45), ज्योती इराबाजी सरोदे (35), सपना तुकाराम राऊत (25) यांचा समावेश आहे. इतर तीन महिला शेतमजूर - पार्वतीबाई बुरड (35), पूर्वाबाई कांबळे (40), सतवाजी जाधव (55) यांना पाण्याबाहेर काढण्यात आले, आहे.
हेही वाचा - Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील त्या घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी केली समिती गठीत
पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनएरएफ) 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
"महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे," असे पंतप्रधान म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केली मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतमजुरांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आणि प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला स्वतंत्रपणे 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.