जेएनएन, नवी दिल्ली. मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पुर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरवला आहे. तर, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब हे रस्त्यावर आली आहेत. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सर्व बाधित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. हे वृत्त अत्यंत दुःखद आहे, या कठीण काळात सर्व बाधित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

गरजूंना सर्वतोपरी मदत करा

मी सरकार आणि प्रशासनाला मदतकार्य जलदगतीने पूर्ण करण्याचे आणि पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे आणि शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचे आवाहन करतो. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा - Maharashtra Rains: दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळणार, कृषीमंत्र्यांची माहिती

    आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

    • येलो अलर्ट- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, 
    • ऑरेंज अलर्ट- चंद्रपूर, गडचिरोली, यतवमाळ,

    हेही वाचा - Ajit Pawar: अजित पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार-खासदार एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार