जेएनएन, नंदुरबार: नंदुरबारमध्ये आदिवासीच्या मुक मोर्चात (Nandurbar tribal march) गोंधळ झाला आहे. त्याला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झालेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका 

नंदुरबारमध्ये आदिवासी बांधवांच्या मुक मोर्चादरम्यान घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन केले आहे.

वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक

आदिवासींचा मूक मोर्चा निघाला होता, आंदोलक निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्यावेळी काही उपद्रव्यांनी कार्यालयातील परिसरातील वाहनांची तोडफोड केली पोलिसांवर दगडफेक केली. 

नंदुरबार येथे एका आदिवासी तरुणाची चाकूने भोकसून हत्या झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आदिवासी समाजाने मुक मोर्चा काढला होता. मात्र, काही उपद्रवींनी यावेळी गोंधळ घातला आणि तोडफोड व दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली.