जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नानंतर आता बंजारा समाजानेही ST आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरला (Banjara community's agitation) आहे. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत त्यांनी सरकारकडे तातडीने हैदराबाद गॅझेट अंतर्गत ST प्रवर्गात आरक्षणची मागणी करावी.
आंदोलनाचे जिल्हे
बीड - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.तर अनेक ठिकाणी आंदोलकांची जबरदस्त गर्दी पहायला मिळाला.
आज बीड शहरात बंजारा समाजबांधवांच्या न्याय्य हक्कासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालो. समाज बांधवांची अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची मागणी ही योग्य असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मी ठाम पाठीशी आहे. pic.twitter.com/0zco3OC0vb
— Sandeep Kshirsagar (@SRK_Speaks_) September 15, 2025
बुलढाणा - बसस्थानक परिसरात निषेध रॅली काढत ST आरक्षणाची मागणी केली आहे.काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय राठोड यांनी या मोर्चा आयोजन केले आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाले.त्यामुळे बंजारा समाजाला ST द्यावा अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
जालना - तहसील कार्यालयासमोर बंजारा समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी निदर्शने केली आहे. आमदार राजेश राठोड आणि काँग्रेसचे नेते आकाश जाधव यांनी बंजारा समाजाला ST चे आरक्षण द्यावी अशी मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या!
- बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणात कायमस्वरूपी स्थान द्यावे.
- हैदराबाद गॅझेटप्रमाणेच समाजासाठी स्वतंत्र गॅझेट लागू करावे.
- समाजावरील अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - Pune Rains: पुण्यात पुढील तीन तासात मुसळधार; पुराच्या पाण्यात अडकली 150 नागरिक, शाळांना सुट्टी जाहीर