मुंबई. Mumbai Municipal Election 2026: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2017 नंतर थेट 2026 मध्ये होत आहे. तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबईत सत्ता मिळवून महापालिकेवर भगवा फडकावण्याचा भाजपाचा निर्धार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

भाजप-शिंदे शिवसेना यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच-

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती असली, तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबईत शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव पाहता, जागावाटपाची चर्चा अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपाची निवडणूक समिती जाहीर-

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने औपचारिक तयारीला सुरुवात करत 20 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. या समितीत केंद्र, राज्य आणि मुंबई स्तरावरील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भाजप मुंबई निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपाच्या मुंबई निवडणूक समितीतील 20 नेते -

    भाजपाच्या या महत्त्वाच्या निवडणूक समितीत या नेत्यांचा समावेश आहे 

    1. अमित साटम – मुंबई भाजप अध्यक्ष

    2. आशिष शेलार -मंत्री

    3. पियुष गोयल – केंद्रीय मंत्री

    4. विनोद तावडे – राष्ट्रीय सरचिटणीस

    5. राहुल नार्वेकर – विधानसभा अध्यक्ष

    6. मंगलप्रभात लोढा – कॅबिनेट मंत्री

    7. प्रवीण दरेकर – गटनेते, विधान परिषद

    8. अतुल भातखळकर – आमदार

    9. भाई गिरकर – माजी मंत्री

    10. योगेश सागर – आमदार

    11. पराग अळवणी – आमदार

    12. मिहीर कोटेचा – आमदार

    13. प्रसाद लाड – आमदार

    14. मनिषा चौधरी – आमदार

    15. चित्रा वाघ – आमदार

    16. राजेश शिरवडकर – महामंत्री, मुंबई भाजप

    17. गणेश खणकर – महामंत्री, मुंबई भाजप

    18. आचार्य पवन त्रिपाठी – महामंत्री, मुंबई भाजप

    19. श्वेता परुळकर – महामंत्री, मुंबई भाजप

    20. प्रभाकर शिंदे – माजी गटनेते, मुंबई महापालिका

    मुंबई जिंकण्यासाठी भाजपाचा फुलप्रूफ प्लॅन-

    या समितीच्या माध्यमातून जागावाटप, उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि संघटनात्मक बांधणी यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अनुभवी नेते, विद्यमान आमदार, केंद्रीय मंत्री आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने भाजपाने मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होते.

    आता महायुतीतील अंतर्गत चर्चा, विरोधकांची रणनीती आणि स्थानिक समीकरणे यावर मुंबई महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.