एजन्सी, नांदेड. Nanded Accident Update: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती IANS या वृत्तसंस्थेनं दिली आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या, अशी माहिती आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी

नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य

हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे.

3 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.

    हेही वाचा - Maharashtra News: मोठा निर्णय, नव्या बांधकामांना 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करणे बंधनकारक

    हळद काढण्यासाठी जात असताना

    नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी दोन महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढले आहे. मात्र अद्याप सात ते आठ जण विहिरीत अडकल्याची माहिती आहे. हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरु आहे.

    हेही वाचा - Maharashtra News: परिवहन विभागाच्या जमीनीवरील अतिक्रमण हटवा - परिवहन मंत्र्यांचे निर्देश