एजन्सी, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्मिळ घटना घडली आहे. इथं एका 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या 'गर्भात गर्भ' असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पोटातील गर्भाच्या शरीरात गर्भ (What is fetus in fetu)
fetus in fetu ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामध्ये पोटातील गर्भाच्या शरीरात विकृत गर्भ असतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दुर्मिळ जन्मजात विसंगती
काही दिवसांपूर्वी 35 आठवड्यांची गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात गेली, तेव्हा ही दुर्मिळ जन्मजात विसंगती आढळून आली, असे डॉक्टरांनी सांगितले.
महिलेच्या गर्भात गर्भ आढळला
रुग्णालयात महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान डॉक्टरांना गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ असल्याची माहिती मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाच लाखांपैकी एक दुर्मिळ घटना
रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, 'गर्भात गर्भ' असणे ही पाच लाखांपैकी एक दुर्मिळ घटना आहे.
आतापर्यंत भारतात 10-15 प्रकरणे
आतापर्यंत जगभरात असे सुमारे 200 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ती देखील प्रसूतीनंतर, ज्यात भारतात 10-15 प्रकरणे आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Weather: येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पाऊस, तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार
‘बाळामध्ये काहीतरी असामान्य दिसले’
"पण मी भाग्यवान आणि जागरूक होतो कारण मला या बाळामध्ये काहीतरी असामान्य दिसले, जे जवळजवळ 35 आठवड्यांचे आहे, काही हाडे आणि पोटात गर्भासारखी रचना असलेले, सामान्य वाढणारा गर्भ दिसला," असे त्यांनी सांगितलं.
हा 'गर्भात गर्भ'
"मला लगेचच कळले की हे सामान्य नाही. हा 'गर्भात गर्भ' आहे, जे जगातील दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे. आम्ही दुसऱ्या एका स्पेशिटीस्ट कडून याबाबत मत मागितले होते. यावेळी रेडिओलॉजिस्ट डॉ. श्रुती थोरात यांनी या प्रकरणाची पुष्टी केली," असं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सांगितलं.
महिलेला छत्रपती संभाजीनगरला हलवले
महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यासाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, असेही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.