जेएनएन, नंदुरबार. Maharashtra Health News: देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी अद्याप अशी अनेक गावे आहेत. ज्या ठिकाणी प्राथमिक सुविधा पोहोचवणे शक्य झालं नाही. महाराष्ट्रातही अशा अनेक घटना घडल्या आहेत की डोंगरावरील गावांतील नागरिकांना झोळीतून रुग्णालयात जावे लागते किंवा नदी किराऱ्यावरील गावातील नागरिकांना योग्य वेळी आरोग्य सुविधा मिळत नाही. काही वेळा अशा घटनांत काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, आता नंदुरबारमध्ये प्रशासनानं दुर्गम गावांत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी नवी अत्याधुनिक तरंगती रुग्णवाहिका बनवली आहे.

रुग्णांना जलद सेवा मिळणार

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या दुर्गम गावांमध्ये आरोग्यसेवा पोहोचवणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. पण आता सार्वजनिक आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) नवी अत्याधुनिक तरंगती रुग्णवाहिका निर्माण केली आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना जलद सेवा मिळणार आहे. प्राथमिक उपचार लवकर मिळल्यामुळे अनेक रुग्णांचा प्राण वाचवण्यात ही तरंगती रुग्णवाहिका मदत करणार आहे.

रुग्णवाहिकेवर एक पथक

या रुग्णवाहिकेत 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. तसंच, या रुग्णवाहिकेवर एक पथकही उपस्थित राहणार आहे. डॉक्टर राहणार असून त्यांच्याकडून रुग्णांची रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

    ही सेवा का खास आहे?

    🔹9 दुर्गम गावांपर्यंत थेट आरोग्यसेवा.

    🔹 24 तास सेवा उपलब्ध ; या पथकासोबत आहेत,

    •👨‍⚕️ डॉक्टर : रुग्णांची तपासणी व उपचार

    •💊 फार्मासिस्ट : आवश्यक औषधे व आरोग्यसल्ला

    •⚓ खलाशी : सुरक्षित जलप्रवास सुनिश्चित करणारा

    •🚤 ड्रायव्हर : रुग्णवाहिकेचा ताबा सांभाळणारा

    •🧪 प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रक्त तपासणी आणि इतर वैद्यकीय चाचण्या

    ✨ अत्याधुनिक सुविधा:

    🔹 तपासणी व प्राथमिक उपचारांसाठी आधुनिक उपकरणे 

    🔹 रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि अन्य चाचण्या 

    🔹 रस्ते नसलेल्या गावांमध्येही पोहोचणारी सेवा 

    🔹 जलद आणि सुरक्षित जलवाहतूक

    दुर्गम भागातील नागरिकांसाठी एक जीवनदायिनी 

    तरंगती रुग्णवाहिका ही दुर्गम भागातील नागरिकांसाठी एक जीवनदायिनी ठरणार आहे. या सेवेमुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जलद आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा एक मोलाचा दगड ठरणार आहे.