जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather News: राज्यातील किमान तापमानात बदल झाल्याने ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता वाढू लागली आहे. यामुळे वातावरणमध्ये मोठे बदल अपेक्षित आहे. दक्षिणेत पावसाला पोषक वातावरण असल्याने राज्यातही ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय
राज्यात उष्णता वाढल्याने तापमानात वाढ झाली असून थंडीचा कमी झाली आहे. उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे दक्षिणेतील काही राज्यात पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Maharashtra Weather Update)
तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार
बदलते वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून येत्या 24 तासात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. दरम्यान राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवणार आहे.
तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात किमान तापमान हे वाढल्याने जानेवारी महिन्यातच राज्यात उष्णता वाढू लागली आहे.
पुढील पाच दिवसाचे हवामान कसे असणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढणार आहे.
असा होत आहे तापमानामध्ये बदल!
हवामान विभागाचा अंदाजनुसार महाराष्ट्रात किमान तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढ होणार आहे. पुढील 24 तासात तापमान वाढ होणार असून काही ठिकाणी पुस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिणेकडील राज्यांना ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याने पावसाचा तडाखा बसणार आहे.