Duplicate Aadhar Card :आधार कार्ड किती महत्त्वाचे कागदपत्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारची आवश्यक आहे. आता UIDAI ने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोपी प्रक्रिया सुरू केली आहे. UIDAI ने एक लिंक जारी केली असून, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आधार डाउनलोड करू शकता. तुम्ही Aadhaar Card कसे डाउनलोड करू शकता जाणून घेऊया.

जर तुमचे मूळ आधार कार्डच हरवले तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण युआयडीएआयच्या (UIDAI) पोर्टलवर जाऊन तुम्ही डुप्लीकेट आधार कार्डासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवर आपली काही माहिती द्यावी लागेल. त्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर युआयडीएआयकडून तुम्हाला आधार कार्डची नवी कॉपी दिली जाईल. तुम्हाला नव्या आधार कार्डची हार्ड कॉपी हवी असल्यास सरकारकडून यासाठी निश्चित करण्यात आलेले शुल्क भरून तुम्ही घरच्या पत्त्यावर आधार कार्ड मागवू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही युआयडीएआयच्या (UIDAI) वेबसाईटवरून डिजिटल कॉपीसुद्धा घेऊ शकता.

डुप्लीकेट आधार (Duplicate aadhar card ) आणि ओरिजनल आधार कार्डमध्ये फरक काय असतो ?

अनेक लोकांना प्रश्न पडतो की, डुप्लीकेट आधार आणि जेन्युइन आधारकार्डमध्ये फरक काय असतो. ओरिजिनल आधार त्याला म्हणतात जे UIDAI च्या ऑफिसियल वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाते किंवा UIDAI  द्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून लाभार्थ्याला घरपोच पाठवले जाते.  राहिली गोष्ट डुप्लीकेट आधार कॉपीची तर असे कोणतेही आधार कार्ड नसते. आपणच आधार कार्ड जे ऑनलाइन डाउनलोड करून बनवले जाते त्याला डुप्लीकेट संबोधले जाते. खरे तर ऑनलाइन डाऊनलोड केलेले आधार कार्ड ओरिजनल असते व संपूर्ण देशभर मान्य केले जाते. त्याचबरोबर या आधारकार्डविषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका व या निष्कर्षावर येऊ नका की, एखादे आधार कार्ड  डुप्लीकेट आहे किंवा ओरिजनल आहे.

असे लोकही आहेत जे ऑनलाईन डाउनलोड केलेल्या आधारकार्डमध्ये मनमानी पद्धतीने छेडछाड (एडिट) करून नवीन आधार कार्ड  बनवतात. याला  डुप्लीकेट आधार कार्ड म्हणतात. जे डिटेल या एडिट केलेल्या आधारमध्ये असतात ते UIDAI च्या डेटाबेसशी मिळते-जुळते नसतात. अशा पद्धतीने आधार कार्ड तयार करण्यापासून दूर रहा. कारण हा एक प्रकारचा गुन्हा आहे व असे केल्याने तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

    असे करा Aadhaar Card डाउनलोड -

    • आधार कार्ड हरवल्यानंतर नवे आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला युआयडीएआयचे (UIDAI)अधिकृत पोर्टलवर  https://eaadhaar.uidai.gov.in/ वर जावे लागेल.
    • वेबसाईटवरील ‘Get Aadhaar’या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवे पेज ओपन होईल. 
    • यानंतर वरच्या बाजूला तुम्ही आधार डाउनलोड करण्याचे तीन पर्याय मिळतील. पहिला पर्याय १२ आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हर्च्यूअल आयडी टाकण्याचा असेल.
    • तुमचा आधार नंबर (UID), नोंदणी क्रमांक (EID) किंवा व्हर्च्युअल संख्या (VID)यापैकी कोणतीही एक माहिती भरावी लागेल. 
    • त्यानंतर एक कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी येईल. 
    • हा सहा अंकी ओटीपी तिथे भरावा. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएसद्वारे मिळेल.
    • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि आधार डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
    • त्यानंतर पुन्हा  एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाल काही प्रश्न विचारण्यात येतील, त्याची उत्तरे तुम्ही भरायची असतात. आता ‘Verify And Download’ या पर्यायावर क्लिक करा. 
    • युआयडीएआयकडून तुमच्या रिक्वेस्टची पडताळणी होईल आणि ती योग्य असल्यास थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या आधार कार्डची डिजिटल कॉपी देण्यात येईल. तुम्ही ही कॉपी ऑनलाईनच डाऊनलोड करू शकता

    कसे कराल आधार कार्डला रिप्रिंट ?

    • जर तुम्हाला आधार कार्डची हार्ड कॉपी हवी असेल आणि ती री-प्रिंट करायची असेल तर युआडीएआयकडून ही सुविधासुद्धा दिली जाते. 
    • आधार रीप्रिंट करवण्यासाठी आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल.
    • अधिकृत वेबसाइटवर आपल्याला Get Aadhaar सेक्शनमध्ये दिसत असलेल्या ऑर्डर आधार रीप्रिंट (Order Aadhaar Reprint (Pilot Basis) पर्याय दिसेल ज्यावर क्लिक करायचे आहे.
    • यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल. जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल तर तुम्ही ते mAadhaar app द्वारे देखील मिळवू शकता.
    • यानंतर आधार नंबर, सिक्योरिटी कोड आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचे आहे. येथे आपल्याला दोन पर्याय दिसतील. जर आपल्याकडे रजिस्टर मोबाइल नंबर नाही तर Do Not Have Registered Mobile Number वर टिक करून आपण रजिस्टर करू इच्छित असलेला नंबर टाकू शकता ज्यावर ओटीपी पाठवण्यात येईल. 
    • सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबरवर आलेल्या ओटीपीला स्क्रीनच्या उजवीकडे दिसत असलेल्या OTP बॉक्समध्ये टाकावे.
    • OTP नोंद झाल्यावर Aadhaar Card प्रीव्यू दिसेल. प्रिव्ह्यूमध्ये नाव, जन्म तारीख आणि पत्ता या सारखी माहिती दिसेल. जर आपण रजिस्टर मोबाइल नंबरने लॉग-इन केलेले नाही तर OTP टाकल्यावर आपल्याला आधार कार्ड प्रीव्यू शो दिसणार नाही.
    • यानंतर आपल्याला मेक पेमेंट (Make Payment) वर क्लिक करायचे आहे. ज्यासाठी 50 रुपए शुल्क लागेल. आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,  इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआई (UPI) यातून कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता.
    • शुल्क भरल्यानंतर आधार कार्ड पुढील 15 दिवसात आपल्या घरच्या पत्त्यावर पोहोच होईल.

    हे ही वाचा -Aadhaar Update : आधारवर पत्ता अपडेट करायचाय? वाचा काय आहे पद्धत अन् कोणत्या कागदपत्रांची असते आवश्यकता