आधार कार्ड ही एक अशी प्रणाली आहे. यामध्ये लोकांना 12 अंकी क्रमांक दिला जातो जो त्यांच्या बायोमेट्रिक्सशी  जोडलेला असतो. कोणत्याही  सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आवश्यक दस्तावेज आहे.

UIDAI ने आधारकार्डवर पत्ता बदलण्याच्या नियमामध्ये  बदल केला आहे. यापूर्वी ओळखीचा पुरावा सादर केल्याशिवाय आधारकार्डावरील पत्ता बदलणे शक्य होते, पण आता आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी अॅड्रेस प्रूफ असणे आवश्यक आहे. आता पत्त्याचा पुरावा दिल्याशिवाय पत्ता बदलता येणार नाही. यामुळे पत्ता बदल करण्यापूर्वी पत्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. 

आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची यादी UIDAIने शेअर केली आहे. यात जवळपास 103 कागदपत्रांचा समावेश आहे. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार आधार अपडेट करता येईल.

नाव/पत्ता बदलण्यासाठी आवश्यक 32 कागदपत्रे -

यूआयडीएआयने माहिती दिली की, पुराव्याशिवाय नावात बदल केला जाणार नाही. यूआयडी एआयने 32 कागदपत्रांचा उल्लेख केला आहे, जे आधार अपडेट करण्यासाठी ग्राह्य धरली जातील. यातील एक कागदपत्र तरी असणे आवश्यक आहे.

पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक, शिधापत्रिका , मतदान ओळखपत्र, वाहनचालवण्याचा परवाना, वीजबिल, पाणीबिल (अलिकडील 3 महिन्याचे) यापैकी कोणतेही एक कागदपत्र पत्ता बदलण्यासाठी चालतं. याशिवाय विमा पॉलिसी, NREGS जॉब कार्ड, पेन्शनर कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, किसान पासबुक, CGHS/ECHS कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आदि कागदपत्रे आधारकार्डमधील पत्ता बदलण्यासाठी सादर करावी लागतील. 

    पती -पत्नीचा पासपोर्ट, लहान मुलं असतील तर त्यांच्या आई-वडिलांचा पासपोर्ट, शाळेचं ओळखपत्र, नाव आणि पत्ता यांचा

    उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला, याशिवाय अन्य काही कागदपत्रेही ग्राह्य धरली जातात. 

    खालील कागदपत्रांचा स्वीकार केला जातो -

    UIDAI च्या मते,आधार कार्डसाठी ओळखीच्या पुराव्यासाठी ३२ प्रकारची कागदपत्रे स्वीकारली जातात. नातेसंबंधांच्या पुराव्यासाठी (Proof Of Relationship) १४ , जन्मतारखेसाठी १५ आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी ४५ कागदपत्रांचा स्वीकार केला जाते. या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे..

    नात्याचा पुरावा (Proof Of Relationship)

    १. मनरेगा जॉब कार्ड

    २. पेन्शन कार्ड

    ३. पासपोर्ट

    ४. आर्मी कॅन्टीन का र्ड

    जन्मतारखेसाठी डॉक्युमेंट (DOB Documnets)

    १. जन्मप्रमाणपत्र

    २. पासपोर्ट

    ३. पॅन कार्ड

    ४. दहावी मार्कशीट्स 

    ५. SSLC पुस्तक/ प्रमाणपत्र

    ओळखीचा पुरा वा (Proof Of Identity PoI)

    1. पासपोर्ट

    2. पॅनकार्ड

    3. रेशन कार्ड

    4. मतदार ओळखपत्र

    5. ड्रायव्हिंग लायसन्स

    ऑनलाइन अर्ज कसा कराल?

    1. पत्ता बदलण्यासाठी सर्वात आधी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट ssup.uidai.gov.in/ssup/ वर जा .

    2. होमपेजवरील Proceed To Update Aadhar Card या ऑप्शनवर क्लिक करा

    3. या नंतर दिलेल्या विहित जागी आधारकार्डवरील 12 अंकी नंबर तिथे टाकून आधार डिटेल व्हेरिफाय करा .

    4. आधार व्हेरिफाय केल्यानंतर सुरक्षेसाठी समोर आलेला कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाका.

    5. वेबसाईटवर दिलेल्या ठिकाणी नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपीचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलनंबरवर आलेला कोड तिथे टाकून एन्टर करा .

    6. दिलेला मोबाईल नंबर हा आधारकार्डला लिंक केलेवे असावा. मोबाइलवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा. 

    7. लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल. .

    8. या नंतर यूआयडीएआयने ज्या ३२ कागदपत्रांचा उल्लेख केला आहे. या पैकी कोणतेही एक सिलेक्ट करा आणि याची

    स्कॅन कॉपी अपलोड करुन सबमिट करा.

    अशा पद्धतीने आधारकार्डवरील तुमचा पत्ता अपडेट होईल.

    आधारवरील पत्ता अपडेट करण्याची ऑफलाईन पद्धत -

    1. आपल्या जवळच्या आधारकार्ड केंद्रावर जा आणि आधारका र्ड अपडेट करण्यासाठीचा फॉर्म भरा 

    2. यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बायोमेट्रिक्स दयावे लागेल. 

    3. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल.त्यावर असलेला रिक्वेस्ट नंबर (URN) वरून तुम्ही तुमच्या आधारकार्डाचे स्टेटस ट्रॅक करु शकता.