डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. (Russia Earthquake) रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ आज (बुधवार) सकाळी एका मोठ्या भूकंपाने पृथ्वी हादरली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.8 पेक्षा जास्त नोंदवली गेली.

1952 नंतर या प्रदेशात आलेल्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी हा एक आहे, ज्यामुळे केवळ स्थानिक पातळीवरच खळबळ माजवली नाही तर जपान आणि पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यावरील अन्य भागातही सुनामीचा धोका निर्माण झाला आहे.

रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या जिओफिजिकल सर्व्हिसच्या कामचटका शाखेने म्हटले आहे की बुधवारी द्वीपकल्पात झालेला भूकंप 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली होता आणि त्यामुळे किनाऱ्याला सुनामीच्या मोठ-मोठ्या व धोकादायक लाटा धडकल्या.

या घटनेची तीव्रता पाहता  7.5 तीव्रतेपर्यंतचे भूकंपाचे ऑप्टर शॉक्स जाणवण्याची शक्यता आहे. हे धक्के पुढील महिनाभर जाणवण्याची शक्यता आहे. असे भूभौतिक सेवेने टेलिग्राम मेसेजिंग अॅपवरील एका निवेदनात म्हटले आहे.

पॅसिफिक प्रदेशातील अनेक भाग रिंग ऑफ फायरवर आहेत-

रिंग ऑफ फायर ही पॅसिफिक महासागराभोवती असलेली एक विशाल ज्वालामुखी आणि भूकंपीय साखळी आहे, म्हणूनच त्याला रिंग ऑफ फायर असे नाव देण्यात आले आहे.

    ही वेगवेगळ्या टेक्टोनिक (Tectonic) प्लेट्सच्या कडांवर पसरलेली एक साखळी आहे. ती दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून न्यूझीलंडपर्यंत 40,000 किलोमीटर (25,000 मैल) पसरलेली आहे. या प्रदेशात सुमारे 90% भूकंप होतात आणि पृथ्वीवरील सर्व सक्रिय ज्वालामुखींपैकी 75% याच प्रदेशात आहेत, म्हणजेच 452 सक्रिय ज्वालामुखी या भागात आहेत.

    या क्षेत्रात कोणते देश आहेत?

    रिंग ऑफ फायर परिसरात बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका यांच्या सीमेवर आहे.

    रिंग ऑफ फायर हा पॅसिफिक महासागरात स्थित एक प्रदेश आहे, या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय ज्वालामुखी आहेत. भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक वारंवार होतो. रिंग ऑफ फायर हा पृथ्वीच्या लिथोस्फेरिक प्लेट्सच्या हालचाली आणि टक्करचा परिणाम आहे.