जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र एच.एस.सी. इयत्ता 12वीचा (HSC) निकाल आज, 5 मे रोजी जाहीर झाला आहे. तुम्हाला बोर्डाचा निकाल दुपारी 1:00 वाजता वेबसाईटवर पाहता येईल. 12 वीच्या बोर्ड परीक्षेला बसलेले उमेदवार तिन्ही शाखांचे निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर तपासू शकता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेऊन विभाग निघाय निकाल जाहीर केला आहे. यामध्ये कोकणाने बाजी मारली आहे.

HSC Result 2025 Maharashtra Board LIVE : यंदाचा विभागनिहाय निकाल

  • कोकण -96.74
  • कोल्हापूर – 93.64
  • मुंबई – 92.93
  • संभाजीनगर – 92.24
  • अमरावती – 91.43
  • पुणे -91.32
  • नाशिक -91.31
  • नागपूर – 90.52
  • लातूर – 89.46

असा पाहा निकाल

जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून निकालाची सर्व माहिती वाचू शकतात. निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईचं नाव वेबसाईटवर टाकावं लागणार आहे.

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?

  • mahresult.nic.in
  • mahahsscboard.in
  • hscresult.mkcl.org

कसा पाहू शकता निकाल?

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in वर भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या 12 वी एचएससी रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका.
  • आता महाराष्ट्र बोर्ड 12 वी रिझल्ट 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर मार्कशिट पीडीएफ पाहा आणि त्यांना डाऊनलोड करा.

 किती मुलांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र बोर्डाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षेला 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 652 मुलींसह 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा दिली होती.

  • 2025-05-05 17:07:46

    HSC Ruselt 2025: शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसंच, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे. सविस्तर वाचा - Maharashtra Board 12th Result 2025: आवड आणि कल जाणून पुढील मार्ग निश्चित करावेत - शिक्षण मंत्र्यांचे आवाहन
  • 2025-05-05 15:43:57

    12th Paper Rechecking: रि-चेकींगचे फॉर्म कधी सुरु होणार

    ज्या विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरायचा आहे. त्यांची मुदत 6 मे 2025 म्हणजे उद्यापासून ते मंगळवार 20 मे 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिकृत सकेंतस्थळावर जाऊन हा अर्ज भरता येणार आहे. प्रत्येक विषयासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सविस्तर वाचा -  Maharashtra 12th Result 2025: बारावीच्या निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे…वाचा सविस्तर
  • 2025-05-05 15:14:47

    20,943 विद्यार्थ्यांना मिळाले सवलतीचे गुण

    खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट/गाईडच्या पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण देण्यात आले. 20,943 विद्यार्थ्यांना यापैकी एका क्षेत्रासाठीचे गुण मिळाले आहेत. 
  • 2025-05-05 14:52:38

    Maharashtra 12th Result: उत्तीर्णतेची टक्केवारी थोडीशी घसरली

    महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालात यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी थोडीशी घसरली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी निकालात 1.49 टक्कांची घट झाली आहे. यंदा 91.88 टक्के निकाल लागला आहे. तर गेल्या वर्षी 93.37% निकाल लागला होता.  गेल्या 5 वर्षांच्या बारावीच्या निकालाची आकडेवारी: 2025: 91.88 टक्के 2024: 93.37 टक्के 2023: 91.25 टक्के 2022: 94.22 टक्के 2021: 99.63 टक्के
  • 2025-05-05 14:11:19

    शरद पवारांनी केलं विद्यार्थांचं अभिनंदन

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारावीच्या विद्यार्थांचे अभिनंदन केलं आहे. त्यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. इयत्ता बारावी हा शैक्षणिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा केवळ शैक्षणिक प्रवासातील एक पायरी नसून, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्वप्नांच्या दिशेने नेणारा एक निर्णायक क्षण आहे. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या यशामागील जिद्द, चिकाटी आणि परिश्रम निश्चितच गौरवास पात्र आहेत. तसेच, या वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदांचे आणि सतत पाठबळ देणाऱ्या पालकांचेही मनःपूर्वक अभिनंदन! सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!, अशा शब्दांत शरद पवारांनी बारावीच्या विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.    
  • 2025-05-05 14:08:38

    12th Results 2025: 38 कॉलेजचा निकाल शून्य टक्के

    बारावीच्या निकालामध्ये 1921 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला. यात 90 ते 99.99 टक्के निकाल लागलेले कॉलेज 4562 आहे. तर शून्य टक्के निकाल लागलेले कॉलेज 38 आहेत. एकूण 10496 कॉलेजातून विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. 20943 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे मार्क मिळाले आहेत. 18 तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.
  • 2025-05-05 13:51:07

    बारावीत वैभवीला मिळाले 85.11 टक्के गुण

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने यंदा बारावीची परीक्षा दिली. ती बारावी उत्तीर्ण झाली असून तिला 85.11 टक्के मिळाले आहेत.

    सविस्तर वाचा - Maharashtra 12 Result 2025: संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने 12 वीत मिळवलं घवघवीत यश, घेतले 85 टक्के
  • 2025-05-05 13:47:08

    सुप्रिया सुळेंनी 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

    इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, अशा खासदार सुप्रिया सुळे यांनी बारावीच्या विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
  • 2025-05-05 13:32:08

    एकनाथ शिंदे यांनी दिल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एच.एस.सी. अर्थात बारावी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तमाम विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि भावी शैक्षणिक वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा!, असे ट्वीट करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  
  • 2025-05-05 13:25:35

    https://hscresult.mahahsscboard.in/ लिंक अ‍ॅक्टीव्हेट

    https://hscresult.mahahsscboard.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 12 वीचा निकाल पाहु शकता.
  • 2025-05-05 13:23:35

    संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने मिळवले 85 टक्के

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने यंदा बारावीची परीक्षा दिली. ती बारावी उत्तीर्ण झाली असून तिला 85.11 टक्के मिळाले आहेत.
  • 2025-05-05 13:21:21

    HSC Result Link: विद्यार्थ्यांसाठी निकालाची लिंक अ‍ॅक्टीव्हेट

    आज बारावीचा निकाल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. दरम्यान आता विद्यार्थ्यांसाठी निकालाची लिंक आता अ‍ॅक्टीव्हेट झाली आहे. आता विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?
    • mahresult.nic.in
    • mahahsscboard.in
    • hscresult.mkcl.org
  • 2025-05-05 13:17:53

    HSC Board Result 2025: 1,49,932 विद्यार्थ्यांनी मिळवले 75 टक्के गुण

    Maharashtra State मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 75 आणि त्याहून अधिक टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,49,932 इतकी आहे. 60 ते 74.99 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4,07,438 इतकी आहे. तर 45 ते 59.99 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5,80,902 इतकी आहे.
  • 2025-05-05 13:09:41

    Maharashtra HSC Result 2025: असा पाहा निकाल

    • आधी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in वर भेट द्या.
    • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या एचएससी रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका.
    • महाराष्ट्र बोर्ड 12 वी रिझल्ट 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
    • त्यानंतर मार्कशिट पीडीएफ पाहा आणि त्यांना डाऊनलोड करा.
  • 2025-05-05 13:03:49

    Maharashtra 12th Result 2025 Update: नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के

    नाशिक विभागात एकूण एक लाख 58 हजार 593 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी एक लाख 57 हजार 842 विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते तर एक लाख 44 हजार 136 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक विभागाचा एकूण निकाल 91.31 आहे तर नऊ विभागांमध्ये नाशिकचा सातवा क्रमांक आहे. सविस्तर वाचा - Maharashtra 12th Result 2025 Update: नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के,  144136 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण
  • 2025-05-05 12:47:59

    MSBSHSE 12th Result Update: 12 वीचा विभाग निहाय निकाल

    MSBSHSE 12th Result 2025 Update
  • 2025-05-05 12:37:39

    HSC Result 2025 Maharashtra Board LIVE: उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी आवश्यक

    उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी घेतल्याशिवाय विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे उत्तराची फोटो कॉपी मिळवण्यासाठी विद्यार्थांना 6 मे ते 20 मे या काळात अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर ही फोटो कॉपी विद्यार्थांना हस्तपोच किंवा ऑनलाइन किंवा रजिस्टार पद्धतीने देण्यात येणार आहे. एका विषयाच्या फोटोकॉपीसाठी 300 रुपये आकारले जाणार आहेत. पुनरमुल्यांकनासाठी 300 रुपये तर छाया पत्रिकेसाठी 400 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल.
  • 2025-05-05 12:37:04

    MSBSHSE 12th Result Out: रि-चेकींगचा फॉर्म कधी भरायचा

    ज्या विद्यार्थांना रि-चेकींगचा फॉर्म भरायचा आहे त्याची मुदत 6 मे 2025 म्हणजे उद्या पासून ते मंगळवार 20 मे 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिकृत सकेंतस्थळावर जाऊन हा अर्ज भरता येणार आहे. प्रत्येक विषयासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 
  • 2025-05-05 12:32:11

    कॉपी प्रकरणात 124 केंद्रांची होणार चौकशी

    गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेवेळी कॉपी होण्याची प्रकरणं वाढली आहे. नऊ विभागीय मंडळात कॉपी प्रकरणी 124 केंद्रांवर चौकशी करुन त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. त्यात पुण्यातील 45, नागपुरातील 33, छत्रपती संभाजी नगरमधील 214, मुंबईतील 9, कोल्हापुरातील 7, अमरावतीतील 17, नाशकातील 12, लातुरातील 37 अशा एकूण 374 कॉपी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
  • 2025-05-05 12:27:14

    HSC Result 2025 Maharashtra Board LIVE: कसा पाहू शकता निकाल?

    कसा पाहू शकता निकाल?
      • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in वर भेट द्या.
      • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या 12 वी एचएससी रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
      • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका.
      • आता महाराष्ट्र बोर्ड 12 वी रिझल्ट 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
      • त्यानंतर मार्कशिट पीडीएफ पाहा आणि त्यांना डाऊनलोड करा.
  • 2025-05-05 11:53:52

    HSC Result 2025 Maharashtra Board LIVE : शाखानिहाय निकाल पाहा?

    विज्ञान शाखा नोंदणी – 7 लाख 37 हजार 205 परीक्षेला बसले – 7 लाख 35 हजार 3 उत्तीर्ण – 7 लाख 15 हजार 595 पास झाले. टक्केवारी – 97.35 टक्के कला शाखा नोंदणी – 3 लाख 54हजार 699. परीक्षेला बसले – 3 लाख 49 हजार 696 उत्तीर्ण – 2 लाख 81हजार 606 टक्केवारी – 80.52 टक्के वाणिज्य विभाग नोंदणी – 3 लाख 766 परीक्षेला बसले – 2 लाख 99 हजार 527 उत्तीर्ण – 2 लाख 77हजार 629 टक्केवारी – 92.68 व्यवसाय नोंदणी – 30 हजार 17 परीक्षेला बसले – 29हजार 363 उत्तीर्ण – 24 हजार 450 टक्केवारी – 93.26 नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 91.88 टक्के
  • 2025-05-05 11:47:39

    दिव्यांग विद्यार्थ्यांचा 92.38 टक्के निकाल

    बारावी परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून 42 हजार 388 रिपीटरने नोंदणी केली. त्यापैकी 42 हजार 24 विद्यार्थांनी परीक्षा दिली. यापैकी 15 हजार 823 पास झाले. एकूण उत्तीर्ण 37.54 टक्के निकाल लागला आहे. 7 हजार 310 दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. 7 हजार 258 विद्यार्थी परीक्षेला बसले. 6 हजार 705 पास झाले. निकाल टक्केवारी 92.38 टक्के इतकी आहे.
  • 2025-05-05 11:44:14

    HSC Result 2025: बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मुलींचा निकाल 94.58 टक्के इतका

    यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 94.58 टक्के इतका लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.51 टक्के इतका लागला आहे.
  • 2025-05-05 11:42:49

    बारावी परीक्षेचा निकाल 91 टक्के लागला

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल 91 टक्के इतका लागला असून, परीक्षेला बसलेल्या 14 लाख विद्यार्थ्यांपैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • 2025-05-05 11:41:05

    HSC Result 2025: लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी

    MSBSHSE मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोणक विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46 टक्के इतका लागला आहे.
  • 2025-05-05 11:37:09

    HSC Result 2025 Maharashtra Board LIVE : यंदाचा विभागनिहाय निकाल

    कोकण -96.74 कोल्हापूर – 93.64 मुंबई – 92.93 संभाजीनगर – 92.24 अमरावती – 91.43 पुणे -91.32 नाशिक -91.31 नागपूर – 90.52 लातूर – 89.46
  • 2025-05-05 11:27:47

    Maharashtra Board Result 2025 Update: बारावीची गुणपत्रिका कशी डाउनलोड करावी

    परीक्षेला बसलेले विद्यार्थी खालील सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून त्यांचा निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात:
    • महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत निकाल पोर्टल hscresult.mahahsscboard.in ला भेट द्या.
    • SSC/ HSC निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
    • महाराष्ट्र 12वीचा रोल नंबर (आसन क्रमांक) आणि आईचे पहिले नाव वापरून लॉग इन करा.
    • महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल.
    • तुमचे तपशील तपासा आणि सर्व काही बरोबर असल्याची खात्री करा.
    • महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2025 गुणपत्रक (marks memo) डाउनलोड करा.
    अधिक वाचा - Maharashtra HSC Result 2025 Today at 1 PM: आईच्या नावासह तुमचा HSC Result कसा पाहावा आणि कशी डाउनलोड करावी e-Marksheet
  • 2025-05-05 11:24:43

    HSC Board Exam Result 2025: मुंबई विभागातून 3,42000 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा

    मुंबई विभागातून एकूण 3 लाख 42 हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. वाणिज्य शाखेतून सर्वाधिक म्हणजेच एक लाख 66 हजारांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यानंतर विज्ञान शाखेच्या 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 47 हजार 879 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
  • 2025-05-05 11:21:50

    Maharashtra Board 12th Result 2025 Update: नागपूर विभागातून 1 लाख 63 हजार 17 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

    नागपूर विभागातून 1 लाख 63 हजार 17 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. विभागातील 498 केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जिल्हा विद्यार्थी संख्या भंडारा – 18,024 चंद्रपूर – 28,819 नागपूर – 66,445 वर्धा – 16,886 गडचिरोली – 12,865 गोंदिया – 19,978 एकूण – 1,63,017
  • 2025-05-05 11:14:02

    HSC Exam Result 2025 : थोड्याच वेळात 12 वीचा निकाल जाहीर

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहाता येणार आहे.
  • 2025-05-05 10:54:45

    HSC Result 2025: निकाल पाहण्यासाठी काय आहे आवश्यक

    बारावीचा निकाल पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेचा क्रमांक आणि आईचे पहिले नाव माहिती असणे आवश्यक आहे. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल डाऊनलोड करता येतील.
  • 2025-05-05 10:51:14

    12 th Result 2025: पास होण्यासाठी किती गुण आवश्यक

    बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात कमीत कमी 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. . प्रत्येक विषयाला 100 गुण असतात. यामध्ये थेअरी 80 गुण आणि प्रक्टिकल/इंटरनल असेसमेंट 20 गुणांची असते. पास होण्यासाठी 100 पैकी कमीत कमी 35 टक्क्यांची आवश्यकता असते. म्हणजेच 80 गुणांच्या थेअरी पेपरमध्ये 28 गुण आणि प्रक्टिकलमध्ये आवश्यक मार्क्स मिळवून पास होण्याची गरज असते.
  • 2025-05-05 10:47:48

    HSC Result 2025: SMS द्वारे असा पाहा बारावीचा निकाल

    राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना एसएमएस द्वारेही हा निकाल पाहता येणार आहे. यासाठी, MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा.